Dharashiv News : सर्व घटकांच्या उन्नतीसाठी सरकार काम करतेय ; आमदार राणा पाटील

सोळा कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
dharashiv
dharashivsakal
Updated on

धाराशिव : समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी सरकार काम करत आहे. मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय लवकरच मार्गी लागेल, असे मत आमदार राणा पाटील यांनी समुद्रवाणी (ता. धाराशिव) येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजनावेळी व्यक्त केले.

यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड, युवराज ढोबळे, ज्ञानेश्वर जंगाले, शिवाजी पसारे, बाजार समितीचे माजी सभापती तानाजी गायकवाड, सरपंच मीराताई हनुमंते, दत्ताभाऊ सोनटक्के, बाळासाहेब खांडेकर, महादेव महाराज साळुंखे, नागनाथ आप्पा पवार, गुरुलिंग स्वामी, नीलकंठ पाटील, दिनेश देशमुख, दयानंद शिंदे, रामभाऊ गव्हाणे, डॉ. निशा पत्तेवार, अमीर पठाण, कार्यकारी अभियंता चव्हाण, ग्रामसेवक शिंदे उपस्थित होते.

यावेळी समुद्रवाणी ते येवती रस्त्याची दुरावस्था झाली होती. १६ कोटी निधीच्या कामाचे भूमिपूजन राणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. गावांतर्गत सिमेंट रस्ता व विठ्ठल बिरुदेव मंदिर सभागृहाच्या कामाचे उद् घाटन करण्यात आले. या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.९ कि.मी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.तसेच समुद्रवाणीत रस्ता व पूल करण्यात येणार आहे.

ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या विकास योजनांच्या माध्यमातून युवकांना रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकार कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. महायुती सरकार मराठा समाजाला कायम स्वरूपी टिकणारे आरक्षण देणार, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय लवकरच मार्गी लागेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.