सेना आमदार तानाजी सावंत बंडखोरीच्या तयारीत! मुख्यमंत्री ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

रामदास कदम यांच्यानंतर आणखीन एका शिवसेना नेत्यामध्ये खदखद
Tanaji Sawant
Tanaji Sawantesakal
Updated on

उस्मानाबाद : राज्यात सत्ता बदलाची चर्चा भाजप नेते करत असतानाच आता सत्ताधारी शिवसेनेच्या एका आमदारानेच येत्या तीन-चार महिन्यात राज्यातील सत्तेचे दिवस बदलतील. पुन्हा वेगळ्या रुपात तुमच्या समोर येणार आहे. काही मागायचं ते मागा असे सांगत त्यांनी सत्ता बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) आमदारांमध्ये असलेली खदखद पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आली आहे. भूम-परांड्याचे (Bhoom Paranda) शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी हे वक्तव्य केले आहे. या संदर्भातील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. (MLA Tanaji Sawant Disappointed On Shiv Sena High Command)

Tanaji Sawant
मुख्यमंत्री ठाकरेंच्या आरोग्यासाठी 'तिरुपती'ला निघालेल्या सुमंत रुईकरांचे निधन

त्यांच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष नुकताच समोर आला आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा हा व्हिडिओ समोर आल्याने शिवसेना आमदारातील नाराजी व खदखद पुन्हा एकदासमोर आली आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस , काॅंग्रेस सोबत युती केल्यामुळे अनेकांना मंत्रीपदापासून दूर राहावे लागले आहे. त्यातच शिवसेना आमदारांची कामे होत नसल्यानेही काही शिवेसना आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यातूनच आमदार तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केले असावे असा अदांज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.