कुस्तीपटू लक्ष्मीच्या मदतीला धावले आमदार चव्हाण,आई झाली भावूक

तिला ऑलिम्पिकमध्ये देशाकडून खेळण्याचा ध्यास लागला होता. मात्र त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीला आर्थिक बळ मिळत नव्हते.
MLC Satish Chavan, Wrestler Laxmi Pawar And Her Family
MLC Satish Chavan, Wrestler Laxmi Pawar And Her Familyesakal
Updated on

औसा (जि.लातूर) : 'सकाळ'ने 'सुवर्णपदक विजेतीवर ऊसतोडीला जाण्याची वेळ' या मथळ्याखाली औसा तालुक्यातील खानापूर तांडा येथील कुस्तीपटू लक्ष्मी पवार (Wrestler Laxmi Pawar) हिच्या आर्थिक अडचणी संदर्भात बातमी प्रकाशित केली होती. या बातमी आमदार सतीश चव्हाण (MLC Satish Pawar) यांनी वाचून तातडीने लक्ष्मीला संपर्क साधला व लोहारा (जि.उस्मानाबाद) येथे लक्ष्मी पवार आणि तिच्या कुटुंबीयांची मंगळवारी (ता. ७) भेट घेत तिच्या पुढील खर्चाची जबाबदारी मी उचलत असल्याचे सांगितले. त्यांनी तात्काळ लक्ष्मी जेथे प्रशिक्षण घेऊ इच्छिते तेथे फोनवर संपर्क साधून तिला जे लागेल ते द्या पैशाची व्यवस्था मी करतो असे सांगताच लक्ष्मीच्या आईला हुंदका आला तर लक्ष्मी पाणावलेल्या डोळ्यांनी आमदारांकडे बघू लागली. चव्हाण यांनी लक्ष्मीला दत्तक घेतल्याने आता तिला ऑलिम्पिकमध्ये (olympic) खेळण्याचा मार्ग मोकळा होणार (Ausa) असुन ती आता तयारीला लागली आहे. खानापूर तांडा येथील प्रतिभावान कुस्तीपटू लक्ष्मी हिच्या नशिबी आर्थिक आडचणींचा सामना करण्याचीच वेळ आली. एखादा कुस्तीपटू तयार होण्यासाठी त्याला लागणारा खुराक, योग्य प्रशिक्षक, साहित्य यावर महिना वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो. (Latur)

MLC Satish Chavan, Wrestler Laxmi Pawar And Her Family
प्रतिक्षा संपली ! या तारखेपासून मिळेल Ola च्या इलेक्ट्रिक स्कूटर्स

दोन एकर कोरडवाहू शेती आणि रोजी रोजगार करुन उदरनिर्वाह करणाऱ्या पवार कुटुबाला लक्ष्मीचा खर्च पेलवत नव्हता. खेलो इंडिया अंतर्गत लक्ष्मीने ६२ किलो गटातून राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले होते. तिने राज्यस्तरीय अनेक पदके पटकावली आहेत. तिला ऑलिम्पिकमध्ये देशाकडून खेळण्याचा ध्यास लागला होता. मात्र त्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीला आर्थिक बळ मिळत नव्हते. आई, बाप आणि भावांनी रोजगार करुन पोटाला चिमटा घेऊन पाठविलेली पुंजी कमी पडू लागल्याने तिने खेळण्याचा नाद सोडून देऊन आईबाबांबरोबर ऊसतोडीला जाण्याचा निर्णय घेतला होता. तिची ही व्यथा 'सकाळ'ने मांडल्यावर आमदार चव्हाण यांनी तिच्या कुटुंबीयाची भेट घेतली. तिला दत्तक घेत असुन पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू घडविणारे किरण मोरे यांच्या ख्यातनाम अॅकॅडमित तिला प्रवेश देत या पुढील सर्व खर्च मी करणार असल्याचे सांगितले. ऑलिम्पिक मध्ये खेळण्याची आशा सोडलेल्या लक्ष्मीला काही वेळ हे खरे आहे का? यावर विश्वास बसत नव्हता तर तिच्या आईने आमदारांसमोरच हुंदका दिला. पाणावलेल्या डोळ्यांनी लक्ष्मीने आभार मानत मी आता कुठेच कमी पडणार नसुन आपण दाखविलेला माझ्यावरचा विश्वास मी सार्थ करुन दाखवेन असा शब्द आमदारांना दिला.

MLC Satish Chavan, Wrestler Laxmi Pawar And Her Family
श्रीलंकन व्यक्तीला ठेचून मारल्यावर पाकिस्तानचे मंत्री म्हणाले,जोश..

लक्ष्मीसारख्या गुणवान खेळाडूला केवळ परिस्थितीमुळे खेळ सोडण्याची पाळी येत असल्याचे सकाळमध्ये वाचले आणि तिला सर्वतोपरी मदत करण्याचे मी ठरविले. आज मी तिच्या कुटुंबाला व तिला आश्वस्त करीत आहे की तिने पुढील काळात एक रुपयाही खर्च करायचा नाही जो खर्च येईल तो मी भरेन फक्त तिने खेळावर लक्ष केंद्रीत करुन स्वतःचे, देशाचे नाव मोठे करावे. सकाळ नेहमीच समाजोपयोगी कामासाठी पुढाकार घेतो याचा पुन्हा प्रत्यय आला.

- सतीश चव्हाण, आमदार

परिस्थितीच्या ओझ्याखाली दबून जात असतांनाच 'सकाळ'ने माझी व्यथा मांडली आणि त्याला तातडीने प्रतिसाद देत आमदार सतीश चव्हाण यांनी माझा सर्व खर्च उचलत मला पुण्यातल्या नामवंत संकुलात प्रवेश मिळवून दिला. आता मी थांबणार नाही. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवूनच परतणार आहे. धन्यवाद सकाळ, धन्यवाद आमदार साहेब !

- लक्ष्मी पवार, कुस्तीपटू, औसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()