Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंच्या ताफ्यावर झाली सुपारीची बरसात! बीडमध्ये मशाल अन् इंजिन आमनेसामने; पाहा Viral Video

Raj Thackeray Beed Visit : राज ठाकरे सुपारी घेऊन बीडमध्ये आले असा आरोप करत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
Raj Thackeray in beed
Raj Thackeray in beed
Updated on

बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बीड दौऱ्यादरम्यान त्यांचा ताफा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या देखील फेकण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर राज ठाकरे यांच्यासमोरच त्यांच्याविरोधात घोषणा देखील देण्यात आल्याचे देखील समोर आले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली.

राज ठाकरे सुपारी घेऊन बीडमध्ये आले असा आरोप करत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांसह कार्यकर्त्यांनी यावेळी गोंधळ घातला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे बीडमध्ये दाखल होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्यांनी त्यांचा ताफा आडवला. यावेळी शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा राडा देखील झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राड ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या.

Raj Thackeray in beed
Video : बच्चन आणि गांधी आले एकत्र..! उपराष्ट्रपतींचा जया बच्चन यांच्याशी पुन्हा वाद, विरोधी पक्षाने केले वॉकआऊट

नेमकं काय झालं?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज त्यांचा दौरा बीडमध्ये होता. जालना रोड परिसरात राज ठाकरे यांची बैठक होणार होती. याच दरम्यान राज ठाकरे दाखल होताच त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर हा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. येथे पोहचताच राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घेरलं. अखेप पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांना बाजूला करत राज ठाकरेंचा ताफा पुढे गेला. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यामुळेच हा राडा झाला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या दोन्ही गटात तणाव निर्माण झाला असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Raj Thackeray in beed
Supreme Court : 'कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून....'; मुंबईतील खासगी कॉलेजमधील हिजाब बंदीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

राज ठाकरे काय म्हणाले होते?

२० जुलैपैसून राज ठाकरे यांचा राज्याचा दौरा सुरू झाला असून २२५ विधानभा मतदारसंघांचा आढावा ते घेणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. सोलापूर दौऱ्यावर असताना महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज नाही असे राज ठाकरे म्हणाले होते, यानंतर मराठा आंदोलक संतप्त झाले असून त्यांच्याकडून राज ठाकरेंना जाब विचारला जात आहे. आजही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.