Dharashiv Crime : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; ३ वर्षाच्या सक्तमजुरीसह २० हजार दंड

शेतात जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा ज्वारीच्या पिकात नेत बळजबरी विनयभंग करण्यात आला होता.
Crime
CrimeEsakal
Updated on

धाराशिव - शेतात जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा ज्वारीच्या पिकात नेत बळजबरी विनयभंग करण्यात आला होता. मागच्या वर्षी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:१५च्या सुमारास सोनगीरी (ता. भूम) येथे ही घटना घडली होती. भूम येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश पाटील यांच्या समोर हा खटला चालला. आरोपी भारत रमेश मारकड यास सक्तमजुरीसह द्रव्यादंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

घरकाम आटोपून गाडीवाटेने एक अल्पवयीन मुलगी एकटीच शेताकडे जात होती. आरोपीने तीच्या मागे येत तीचा हात धरून आपल्या ज्वारीच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखत अल्पवयीन महिलेने तिथून पळ काढत आपला जीव वाचवला. या प्रकरणी भूम पोलीस ठाण्यात अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कलम ३५४, ३५४(ड), ८, १२, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. खटला न्यायालयात सुरू असताना पीडित फिर्यादीच्या वतीने एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले.

न्यायालयासमोर आलेला साक्षीपुराव्यासह अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख व जयंत देशमुख यांचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. आरोपीस कलम ३५४नुसार दोषी धरत १ वर्ष सश्रम कारावासासह ५ हजारांचा दंड. ३५४(ड)नुसार १ वर्ष सश्रम कारावासासह ५ हजार दंड. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ८नुसार ३ वर्षे सक्तमजुरीसह ५ हजार दंड. याच कायद्याच्या कलम १२नुसार १ वर्ष सक्तमजुरीसह ५ हजार दंड ठोठावण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.