मराठा आरक्षणासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला.
बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला.
Updated on
Summary

चार दिवसांतच त्यांनी जोरदार तयारी करुन सोमवारी (ता. २८) साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान मोर्चाला सुरुवात झाली.

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासह Maratha Reservation इतर मागण्यांसाठी भाजप आमदार सुरेश धस BJP MLA Suresh Dhas यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर Beed पोचला. प्रमुख नेत्यांच्या भाषणानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोविड काळात कंत्राटी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, ऊसतोड कामगार कायदा करावा आदी विविध मागण्यांसाठी चार दिवसांपूर्वी सुरेश धस यांनी मोर्चाची घोषणा केली होती. चार दिवसांतच त्यांनी जोरदार तयारी करुन सोमवारी (ता.२८) साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्त्यावरुन घोषणाबाजी करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये आमदार लक्ष्मण पवार, माजी आमदार आर. टी. देशमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मिरा गांधले आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले.morcha held in beed for maratha reservation

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला.
आम्ही फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, कारण... - संजय राऊत

मुस्लिम समाजाकडून पुष्पवृष्टी

मुस्लिम बहुल बशीरंग भागातून मोर्चा पुढे जात असताना मुस्लिम समाज बांधवांनी मोर्चावर पुष्पवृष्टी केली. मोर्चाला धनगर समाज, आदिवासी समाजासह इतर समाज संघटनांनीही पाठींबा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.