धक्कादायक ! प्रसूतीदरम्यान रक्तस्त्राव; माजलगावमध्ये आई अन् बाळाचा मृत्यू

आई अन् बाळाचा मृत्यू, दवाखान्यात तणावाची स्थिती
Mother And Her New Born Bay Died In Beed
Mother And Her New Born Bay Died In Beed esakal
Updated on

माजलगाव (जि.बीड) : शहरातील जाजु हॉस्पिटलमध्ये एका गरोदर मातेचा बाळासह मृत्यु झाल्याची घटना सोमवारी (ता.16) घडली. या प्रकरणी या डॉक्टर दाम्पत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने दवाखान्यात तणावाचे वातावरण झाले होते. खेर्डा (ता.माजलगाव) येथील सोनाली पवन गायकवाड (वय 22) या रविवारी सात वाजता प्रसुतीकळा येत असल्याने प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. मागील नऊ महिन्यापासून याच ठिकाणी त्यांची ट्रिटमेंट चालु होती. सोमवारी पहाटे सकाळी सहा वाजता या महिलेची परिस्थिती गंभीर झाली. (Mother And Her New Born Baby Died In Majalgaon Of Beed)

Mother And Her New Born Bay Died In Beed
Osmanabad Accident| कार पलटी; एकाचा जागेवरच मृत्यू, पाच जण जखमी

त्यामुळे त्यांना औरंगाबाद (Aurangabad) येथे जाण्यासाठी रेफर करण्यात आले. परंतु पुढील तयारी करे पर्यंत या महिलेचा मृत्यु झाला. डॉ. उर्मिला जाजु यांनी योग्यवेळी आम्हाला पेशंटबाबत कल्पना दिली नाही. त्यामुळेच महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने हॉस्पिटलमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले, परंतु जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. नातेवाईकांनी सदरील आई व बाळाचा मृतदेह दवाखान्यातच ठेवत डॉक्टर दाम्पत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा मृतदेह हलवु देणार नाहीत, अशी भुमिका घेतली होती. यावेळी पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, श्री. केंद्रे व नागरिकांनी जमावाला शांत केले. सदरील जमावाने गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलिस ठाणे गाठले. त्यांची तक्रार दाखल करून तांत्रीक बाबींचा तपास करून तसेच शवविच्छेदन अहवालावरून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. यानंतर महिला व बाळाचे मृतदेह अंबाजोगाई याठिकाणी शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मृत सोनाली गायकवाड यांची ही पहिलीची प्रसुती होती. यामध्ये त्यांचा व त्यांच्या बाळाचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Mother And Her New Born Bay Died In Beed
बंगालमध्ये क्लोरिन गॅसची गळती, १५ जणांची तब्येत बिघडली

मागील नऊ महिन्यांपासून गरोदर महिला रूग्णांवर योग्य उपचार केले आहेत. प्रसुतीसाठी आल्यानंतर परिस्थिती व्यवस्थित होती तर बाळाची तब्येत मात्र नाजुक असल्याचेही नातेवाईकांना सांगितले होते तर नातेवाईकांच्या समंतीने प्रसुती देखिल नॉर्मल केली होती. परंतु सदर रूग्णाला झटका आल्यानंतर त्यासंदर्भातील उपचारही केले परंतु परिस्थिती गंभीर होत असल्याने सदर महिलेला औरंगाबाद किंवा अंबाजोगाई येथे उपचारासाठी रेफर लेटर देवून पाठविले होते.

- डॉ. उर्मिला जाजू, जाजू हॉस्पिटल.

गरोदर माता व बाळाच्या मृत्युप्रकरणी स्त्रीरोगतज्ज्ञ, सर्जन आणि भुलतज्ज्ञांची त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती माजलगावमध्ये पाठविण्यात आले असुन या समितीचा अहवाल आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.

- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.