Uddhav Thackeray: ठाकरे गटाच्या दोन शिलेदारांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, अजित पवार गटाची तक्रार! नेमकं प्रकरण काय?

MP Omraje Nimbalkar and MLA Kailas Patil: राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांच्या उमेदवार प्रतिनिधी रेवनसिध्द लामतुरे यांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
 Uddhav Thackeray and Ajit Pawar news
Uddhav Thackeray and Ajit Pawar newsesakal
Updated on

धाराशिव - ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यासह त्यांच्या अंगरक्षकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले गेले आहेत. ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील यांच्यासह त्यांच्या अंगरक्षक, असे चार जणांवर गुन्हा दाखल करा आणि एफआयर प्रत जिल्हा निवडणूक आयोगाकडे द्या, असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची तक्रार-

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी त्यांच्या उमेदवार प्रतिनिधी रेवनसिध्द लामतुरे यांच्या माध्यमातून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यांनी आरोप केला होता की लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे आपल्या अंगरक्षकांसह मतमोजणी केंद्रावर फिरत होते. त्यामुळे मतमोजणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दबाव निर्माण झाल्याचा आरोप केला होता.

सिसीटीव्ही फुटेज तपासणी-

तक्रारीवरून निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी सिसिटिव्ही फुटेज तपासून आचारसंहिता भंग झाला की नाही याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. ओमराजे हे उमेदवार असले तरी ते अंगरक्षकांसह मतमोजणी केंद्रात जावू शकत नाहीत असे तक्रारीत नमूद केले होते.

 Uddhav Thackeray and Ajit Pawar news
Tansa Dam Water : मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा धरण ओव्हरफ्लो; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा

गुन्हा नोंद करण्याचे आदेश-

पोलिस अधिक्षकांनी अहवाल सादर केल्यानंतर गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी आदेश दिले. या आदेशानुसार ओमराजे निंबाळकर, कैलास पाटील आणि त्यांच्या अंगरक्षकांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. आचारसंहिता भंगाच्या या घटनेने राजकीय वातावरण तापले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 Uddhav Thackeray and Ajit Pawar news
Manoj Jarange : राज्याचे मुख्यमंत्री व्हा अन्... मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दरेकरांचे जरांगेंना जोरदार प्रत्युत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.