माजी मंत्री रजनी सातव यांचे सुपुत्र असलेल्या राजीव सातव यांनी पुण्याच्या फरगुसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करीत 2000 मध्ये आपल्या आईचा राजकीय वारसा पुढे चालवण्या करिता राजकारणात उडी घेतली.
कळमनुरी (हिंगोली) : कळमनुरी (Kalamanuri) सारख्या मागास भागातून पुढे येत आपल्या आईपासून घेतलेला राजकीय वारसा विकास कामाच्या माध्यमातून निष्ठेने व प्रामाणिकपणे पुढे नेत राहुल गांधीचे शिलेदार म्हणून हिंगोलीचे नाव दिल्ली दरबारी उमटवणारा एक काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केलेल्या खासदार अॅड राजीव सातव (MP rajiv satav) यांच्या अकाली निधनामुळे (Died) कळमनुरी (Kalamanuri) पर्यायाने मराठवाड्याची मोठी राजकीय हानी झाली आहे. (MP rajiv satav's political journey)
माजी मंत्री रजनी सातव यांचे सुपुत्र असलेल्या राजीव सातव यांनी पुण्याच्या फरगुसन महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करीत 2000 मध्ये आपल्या आईचा राजकीय वारसा पुढे चालवण्या करिता राजकारणात उडी घेतली. त्यांनी आपले मूळ गाव असलेल्या मसोड पंचायत समिती मधून 2002 मध्ये निवडून येत पंचायत समिती सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाला सुरुवात करत तालुक्यातील राजकारणाची सूत्रे हाती घेतली. 2007 ला खरवड गटातून सर्वाधिक मते घेऊन जिल्हा परिषदला निवडून येत कृषी सभापती म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
कृषी सभापती म्हणून केलेल्या कार्याची उल्लेखनीय नोंद पक्षश्रेष्ठींनी सुद्धा घेतली. त्यानंतर पक्षसंघटनेत युवक काँग्रेसचे राज्याची जबाबदारी सांभाळण्याचे काम त्यांच्यावर पक्ष नेते राहुल गांधी यांनी सोपविले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी राज्यभर युवकांचे संघटन तयार करून युवकांची एक मजबूत फळी उभी करत आपल्या कामाचा एक वेगळा पॅटर्न निर्माण करीत त्यांनी पक्ष नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याकडे आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. यामधून त्यांना पुढे चालून राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद देण्यात आले. त्यानंतर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी विधानसभा मतदार संघातून यांना कॉंग्रस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. स्वतः राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्यासाठी कळमनुरी येथे प्रचार सभा घेतली.
निवडून आल्यानंतर पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी मतदार संघातील येथील राज्य राखीव दलाच्या प्रशिक्षण स्थळांबरोबरच राज्यात केवळ बारामती कारंजा व कळमनुरी येथे उभारण्यात आलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत पॅटर्न ही सातव यांनी पूर्णत्वास नेला. काम करण्याची वेगळी पद्धत हातात घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याची हातोटी पाहता पक्षनेतृत्वाने 2014 मध्ये त्यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघांमधून पक्षाची उमेदवारी दिली. राज्यात सर्वत्र मोदी लाट असताना श्री सातव हिंगोली लोकसभा मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर त्यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघा अंतर्गत विकासाच्या कामाबरोबरच पक्षवाढीसाठी ही मोठे योगदान दिले. लोकसभेच्या कामामध्ये अभ्यासपूर्ण प्रश्न मांडून त्यांनी तीन वेळा उत्कृष्ट संसदपटू म्हणून बहुमान मिळवला होता.
पक्षनेतृत्वाने चिकाटीने काम करणारा काँग्रेस पक्षाचा आहे. एक तरुण तडफदार नेता म्हणून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. ज्यामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव गुजरात राज्याचे प्रभारी यांचा समावेश आहे. पक्ष नेतृत्वाने त्यांना महाराष्ट्र राज्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली होती. अतिशय कमी वयात अल्पावधीत राज्यसभेवर काम करताना श्री. सातव यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे आपला वेगळा ठसा उमटविला होता. त्यांनी देशभरातील काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवत आपली ओळख निर्माण केली होती. दुसऱ्या बाजूला राज्याच्या राजकारणात ओबीसी नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
(MP rajiv satav's political journey)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.