MPSC Result 2024 : शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक; स्पर्धा परीक्षेतील अनेक अपयशानंतर यश आणले खेचून

मच्छिंद्रनाथ चिंचोली (ता. घनसावंगी) येथील शेतकरीपुत्र प्रसाद विध्वंस यांनी पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवले आहे.
mpsc result 2024 farmer son prasad vidwans become psi police force
mpsc result 2024 farmer son prasad vidwans become psi police forcesakal
Updated on

घनसावंगी : मच्छिंद्रनाथ चिंचोली (ता. घनसावंगी) येथील शेतकरीपुत्र प्रसाद विध्वंस यांनी पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांची ग्राउंडची तयारी सुरू असताना तलाठीपदी नुकतीच निवड झाली होती. त्यानंतर सहा महिन्यांतच पोलिस उपनिरीक्षक या पदाला त्यांनी गवसणी घातली आहे.

मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील शेतकरी लालाबुवा दतुबा विध्वंस यांची तीन ते चार एकर शेती जमीन आहे. यातून मिळालेल्या तुटपुंज्या कमाईवर त्यांनी मुलाचे शिक्षण केले. त्यांचा मुलगा प्रसाद विध्वंसचे प्राथमिक शिक्षण मच्छिंद्रनाथ चिंचोली त्यांनतर पाचवी ते दहावीचे शिक्षण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे राजर्षी शाहू विद्यालय मुदखेड येथील वसतिगृहात राहून घेतले. पुढे पदवीपर्यंत शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय नांदेड येथे पूर्ण केले. पदवीचे शिक्षण घेताना समाजकल्याण वसतिगृहाचा आसरा त्यांनी घेतला.

mpsc result 2024 farmer son prasad vidwans become psi police force
MPSC Result 2024 : निरगुडसर येथील भाजीपाला विक्रेत्यांचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक

शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, यश मिळाले नाही. पुढे वर्ष २०२२ च्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत पूर्व, मुख्य परीक्षा व ग्राउंड यशस्वी झाल्यानंतर मुलाखतीत चार गुणांनी ही पोस्ट हुकली. वर्ष २०१९ च्या फॉरेस्ट गार्ड परीक्षेत दोन गुणांनी ही पोस्ट हुकली असे अनेक अपयशाचे झटके सहन करीत स्पर्धा परीक्षेची तयारी सोडली नाही. उपनिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याने त्यांची संपूर्ण गावात वाजत-गाजत मिरवणूक काढून त्यास पुढील वाटचालीसाठी गावकऱ्यांनी शुभेच्छा देण्यात आल्या.

mpsc result 2024 farmer son prasad vidwans become psi police force
MPSC Result 2024 : खडतर परिश्रमातून हिर्डोशीचा योगेश बनला पोलिस उपनिरीक्षक

स्पर्धा परीक्षेत अपयश येतच राहते. त्यामुळे खचून न जाता त्याला बाजूला सारून सातत्य ठेवले, तर अशक्‍य असे काही नाही. त्यामुळे आपली तलाठीपदी निवड झाली होती. नुकतीच पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल लागला आहे. यापुढे स्पर्धा परीक्षेची तयारी कायम ठेवून राज्यसेवा परीक्षेत यश मिळविण्याचा आपला मानस आहे.

— प्रसाद विध्वंस, पोलिस उपनिरीक्षक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.