लालपरीत प्रवाशांच्या डोक्यावर छत्री! Viral Videoनंतर एसटी करणार कारवाई | ST Bus

यंत्र अभियंता महाव्यवस्थापकांनी बुधवारी काढले आदेश अन् गुरुवारी नांदेड जिल्ह्यातील देगलुर आगाराच्या गळक्या बसचा व्हिडिओ झाला व्हायरल
ST Bus Video Viral
ST Bus Video ViralSakal
Updated on

मुंबई : बुधवारी अहेरी डेपोची छत उडणाऱ्या बसचा व्हिडिओ व्हायरल झाला. एसटी महामंडळाची बदनामी झाल्याच्या आरोपावरून तडकाफडकी विभागीय यंत्र अभियंत्याचे निलंबन करण्यात आले. त्यानंतर तातडीने यंत्र अभियंता महाव्यवस्थापकांनी सावधानी म्हणून रस्त्यावर गळक्या बसेस दिसल्यास गंभीर दखल घेतल्या जाईल अशी तंबी वजा कारवाईचा इशारा देणारे बुधवारी आदेश काढले.

मात्र, त्यानंतर लगेच गुरुवारी नांदेड जिल्ह्यातील देगलुर आगाराच्या एका गळक्या बसचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यामुळे एसटी महामंडळाच्या खिळखिळ्या भंगार बसेसची पुन्हा पोलखोल झाली आहे.

ST Bus Video Viral
Mumbai Taxi Meter Fraud : मुंबईत टॅक्सीचालकाकडून मीटरचोरी? प्रवाशाकडून Video Viral

कोरोना महामारी नंतर संपामुळे एसटी महामंडळाची सेवा संपूर्णतः ठप्प होती. त्यामुळे बसेस बंद अवस्थेत एकाच ठिकाणी उभ्या होत्या. त्यामुळे बसेसचे टायर खराब झालेत, इंजिनचे काम निघाले, वायरिंग खराब झाल्यात, बसेस नादुरुस्तीचे प्रमाण वाढले. त्याचा परिणाम राज्यातील नियमित ६५ लाख प्रवाशांच्या वाहतुकीवर झाला.

प्रवाशांच्या मागणीप्रमाणे लागणाऱ्या बसेसची संख्या अचानक घटली, साध्या बसेसची सर्वाधिक मागणी असतांना, बसेस नादुरूस्तीमुळे दुरुस्तीसाठी आगारात पडून राहिल्या मात्र, त्याच्या दुरुस्त्या झाल्या नाही. अहेरी बस प्रकरणात सुद्धा डेपो मॅनेजर ने लेखी स्वरूपात वेळोवेळी तक्रारी करूनही बसची दुरुस्ती झाली नसल्याने अखेर, छत उडणाऱ्या बसचा प्रवासी वाहतूक करतांना व्हिडिओ व्हायरल झाला.

त्यामुळे सध्या स्थितीत एसटी महामंडळात ग्रामीण भागातील साध्या बसेस मधून नियमित होणाऱ्या प्रवासी वाहतुकीसाठी बसेसची संख्या कमी पडत असल्याने अखेर अशा नादुरुस्त, खिळखिळ्या आणि गळक्या बसेस सुद्धा रस्त्यावर काढल्या जात असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील गळक्या बसच्या व्हायरल व्हिडिओ नंतर सबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते हे बघावे लागणार आहे.

ST Bus Video Viral
Duplicate Narendra Modi : 'हे खरं बोलणारे मोदी'; थोरातांनी घेतली 'त्या' मोदींनी भेट, विधीमंडळात चर्चांना उधाण

छत्री घेऊन प्रवाशांचा एसटीतून प्रवास

नांदेड जिल्ह्यातील देगलूर आगारातील एका गळक्या बसचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला आहे. या बस मध्ये प्रवाशांना आपल्या अंगावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी छत्रीचा वापर बस मध्ये करावा लागत आहे.

एसटी महामंडळाचे यंत्र अभियांत्रिकी विभागाने नुकतेच गळक्या बसेस संदर्भात आदेश काढले होते. त्यानुसार सबंधित बसची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02xqVQErrzSLBhHFPnKMAaxgci72T7o8iTxYHyuzYWUnNTcBc6vynfJ1sVxvf7rARnl&id=100009583446875&sfnsn=wiwspwa&mibextid=6aamW6

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.