बीडमध्ये Mucormycosisचे सर्वाधिक रुग्ण ४५ वर्षांच्या पुढचे

नवीन तीन रुग्णांसह तीन मृत्यूंची भर, १८ वर्षाखालील एकाला लागण, ४२ रुग्णांवर शस्त्रक्रिया
Mucormycosis
MucormycosisMucormycosis
Updated on

बीड: कोरोना विषाणू संसर्गानंतर ब्लॅक फंगल्समुळे (black fungus) होणाऱ्या म्युकरमायकोसिच्या ८९ रुग्णांमध्ये सर्वाधिक ६७ रुग्ण पंचेचाळीसच्या पुढचे आहेत. १८ वर्षाखालील देखील एकाचा समावेश आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. २७) आणखी तीन रुग्णांची भर पडून नवीन तीन मृत्यू झाले आहेत. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ४२ रुग्णांवर म्युकरमायकोसिसच्या (Mucormycosis) रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्याची माहिती कान- नाक-घसा तज्ज्ञ डॉ. प्रशांत देशपांडे यांनी दिली.

जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या कोरोनानंतर उद्भवणाऱ्या ब्लॅक फंगल्स आजाराच्या रुग्णांची वाढ होत आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आतापर्यंत ८९ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये काही रुग्ण बाहेर जिल्ह्यातील देखील आहेत. दरम्यान, आतापर्यंत ८९ रुग्णांपैकी ४२ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या असून १५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर, १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या ६१ रुग्ण उपचाराखाली आहेत. दरम्यान, सर्वाधिक रुग्ण ४५ वयांपेक्षा अधिक वय असलेले आहेत.

Mucormycosis
औरंगाबादेत म्यूकर मायकोसिसचा धोका वाढला! शहरात तीनशेवर रुग्ण

म्युकरमायकोसिसचे वयनिहाय रुग्ण
- १८ वर्षाखालील : १
- १८ ते ४५ : २१
- ४५ - ६० : ३०
- ६० वर्षांवरील : ३७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.