मुरुम : महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोथळी गावच्या चेक पोस्ट येथे रोजी मध्यरात्री कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असलेल्या गुटख्याच्या वाहनावर मुरुम पोलिसांकडून मोठी कारवाई करुन तब्बल २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार यांना गुप्त बातमीदाराने गुटखा भरून पिकअप वाहन येत असल्याची माहिती दिली.