माझे पती देशासाठी विनाकारण शहीद झाले, वीरपत्नीची व्यथा...काय आहे ते वाचा 

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : आपले पाल्य सुस्कांरीत व्हावे व त्याने भविष्यात मोठे होऊन आपल्या परिवाराचे नाव करावे असे प्रत्येक पालकाला वाटते. त्यामुळे शहीद संभाजी कदम यांच्या लाडक्या लेकीला चांगले शिक्षण मिळावे यासाठी त्यांची पत्नी धडपड करत आहे. तिला शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून वीरपत्नी आपल्या मुलीला घेऊन त्या शाळेत गेल्या. मात्र त्यांच्या मुलीला प्रवेश देणे तर सोडाच उलट वीरपत्नी श्रीमती कदम यांचा शाळेने अपमान केला. हा अपमान सहन करत शाळेतून बाहेर पडलेल्या शितल कदम यांनी माझे पती देशासाठी विनाकारण शहीद झाल्याची भावना व्यक्त केली. 

जानापूरी (ता. लोहा) येथील संभाजी कदम हे देशसेवा करत असतांना जम्मु काश्‍मीरमध्ये नोव्हेंबर २०१६ मध्ये शहीद झाले. त्यांच्या अंत्यविधीला संपूर्ण जिल्हा व आजू बाजूच्या जिल्ह्यातील मंडळी मोठ्या संख्येने आली होती. नांदेडच्या श्री. गुरु गोविंदसिंग विमानतळावरून त्यांची शवयात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दोन्ही कडेला खचाखच गर्दी झाली होती. एवढेच नाही तर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी भेट देऊन या कुटुंबाला धीर देत आर्थीक मदत केली होती. घराचा आधार गेलेल्या या कदम कुटुंबातील वीर पत्नी शितल कदम यांनी आपला प्रपंच चालविला. त्यांना माजी सैनिक कार्यालयात नोकरी मिळाली. त्या सध्या तिथे कार्यरत आहेत. 

पती शहीद झाल्यानंतर कुटुंब सावरले

पती संभाजी कदम हे शहीद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने घरगाडा सांभाळला. आपल्या लाडक्या लेकिला तेजस्वीनी (वय सात)चांगले शिक्षण मिळावे म्हणून तीने शहरातील नामांकीत इंग्रजी माध्यमाची शाळा ज्ञानमाता विद्याविहार गाठले. मुलगीही प्रवेश मिळणारम्हणून आनंदात उड्या मारात आपल्या आईसोबत शाळेत गेली. परंतु त्या ठिकाणी शितल कदम यांना अपमानीत वागणूक मिळाली. त्यांच्या पाल्याचा प्रवेश करुन घेतला नाही. यामुळे उद्वीग्न झालेल्या शितल कदम यांनी एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीत शाळेच्या व्यवस्थापनाबद्दल संताप व्यक्त केला. 

शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली

शहिदाच्या पत्नीस असी वागणूक मिळत असले तर अन्य पालकांची काय स्थिती असेल यावर न बोललेले बरे असे म्हणत त्यांनी माझे पती देशासाठी विनाकारण शहीद झाल्याची भावना व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांच्या पाल्यांना मोफत प्रवेश द्यावा असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी पत्र दिले. परंतु त्यांच्याही पत्राला या शाळेने केराची टोपली दाखवली. शितल कदम यांना शाळेच्या संचालकांना भेटू दिले नाही. त्यांनी शाळेचे डोनेशन भरण्याची तयारी दाखविली मात्र त्यांना अपमानीत करून शाळेतून बाहेर काढले. एखाद्या शहीदाच्या वीरपत्नीस जर ही शाळा अशी वागणूक देत असले तर अन्य सर्वसाधारण पालकांची काय अवस्था असेल असे शीतल कदम यांनी एका वृत्त वाहिणीला सांगितले.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.