औंढानागनाथ ( हिंगोली) : एक वर्षापासून कोरोना संकटाने मंदिर बंदच राहत आहे. नागनाथ देवस्थानचे उत्पन्न केवळ येणाऱ्या भाविकांच्या तसेच पर्यटकांच्या संख्येवर अवलंबून आहे. त्यामुळे जेव्हा भाविक येतील तेव्हाच मंदिराच सगळ अर्थकारण सुरु असते. परंतु गेल्या तेरा महिन्यापासून नागनाथ मंदिर बंद आहे.
परंतु नागनाथ देवस्थानकडून होणारा खर्च हा मात्र सुरूच आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे असलेला ८० ते १०० कर्मचारी वर्ग त्यांच्या महिन्याला होणाऱ्या पगारी, लाईट बिल, पहिल्या लाँडाऊनमध्ये गरजूना वाटलेल्या धान्याच्या किट आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिलेल्या २१ लाख रुपयांचा फंड या सगळ्यांचे गणित जर लावले तर महिन्याकाठी दहा लाख रुपये संस्थांनचा खर्च आहे.
वर्षभरात दीड कोटी रुपये संस्थानचा आतापर्यंत निव्वळ खर्च झालेला आहे. आणि उत्पन्न तर एक रुपयाही संस्थांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. त्यामुळे आतापर्यंत जी जमा राशी संस्थांनकडे होती. जे सुरक्षित बॉण्ड होते ते बोंड मोडून लाईट बील इतर खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या पगारी या संस्थांना कराव्या लागत आहेत. गेल्या एक मार्चपासून मंदिर बंद आहे. आता पुन्हा जर लाँकडाऊन लागले. तर येणाऱ्या काळामध्ये देवस्थानला आपले सर्व डिपॉझिट मोडावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागनाथ संस्थान श्रीमंत देवस्थानांमध्ये कधीही मोडला जात नाही.
शासनाच्या तीर्थक्षेत्राच्या 'ब' दर्जाचे हे तीर्थक्षेत्र असून ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे या ठिकाणी तुरळक भाविकांची संख्या असते. आणि दानपेट्या देणगी यावरच संस्थांचं दैनंदिन कामकाज चालते. देवस्थानला दुसरा कुठलाही उत्पन्नाचा स्त्रोत नाही. तसेच देवस्थानला इनामी जमीनसुद्धा नाही. नागनाथ देवस्थानला अवघी दहा एकर जमीन होती. या जमिनीवर नागनाथ उद्यान उभे राहिल्याने त्याचही उत्पन्न संस्थांना मिळालेले नाही. गेल्या सहा महिन्यापासून सुरक्षित अनामत रक्कम मोडूनच संस्थांनचा खर्च सुरु आहे. तेव्हा या सर्व बाबीकडे नागनाथ संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पदसिद्ध अध्यक्ष आमदार यांनी लक्ष द्यावे. संस्थांवर अवलंबून असलेले फुलविक्रेते, प्रसादाचे दुकान पुजारी, पुरोहित हे सर्व मंदिरास भेट देणाऱ्या भाविकांवर अवलंबून आपली उपजीविका करीत असतात. परंतु त्यांचे देखील उत्पन्न शुन्यावर आले आहे.
१९९६ ते २००० या काळात जे विश्वस्त मंडळ होते. त्या विश्वस्त मंडळाने १५ लाख रुपये कर्ज घेऊन मंदिराची व्यापारी संकुल उभारले होते. साधारण २० वर्षांपूर्वीच्या देवस्थानला १५ लाख रुपयांचं कर्ज घ्यावं लागले. त्यानंतर आता जमा झालेली सुरक्षित अनामत राशी ही खर्च करावा लागत आहे. या सर्व बाबींवर वरिष्ठांनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं अशी सामान्य शिवभक्तांची मागणी सर्व सुरक्षेचे नियम पाळत आहेत. तशा प्रकारच्या सुचनांचे पालनही नागनाथ देवस्थान करेल तेव्हा येणाऱ्या भाविकांना तसेच पर्यटकांना तपासणी करून किंवा वेळेमध्ये बदल करून दर्शन सुरू करा, अशी मागणी केली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.