नायगाव - मागच्या पाच वर्षात दोन हजार कोटीचे कामे केल्याच्या पोकळ घोषणा करणाऱ्या आ. राजेश पवार यांनी मतदारसंघात आजपर्यंत एकही नवीन उद्योग आणला तर नाहीच. पण एकाही बेरोजगाराच्या हाताला काम मिळाले नाही. त्यामुळे मतदारसंघात त्यांना तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याने रोजगार व उद्योग धंद्यावरुन कोंडी होताना दिसत आहे.