Nanded Accident: तीर्थ यात्रेला निघालेल्या भाविकांच्या ट्रव्हल्सने कंटेनरला दिली धडक; 20 जखमी, चार गंभीर!

Latest Marathwada News: आ. राजेश पवार यांनी रुग्णालयात भेट देवून जखमींना तातडीने नांदेडला हलविले. अपघाग्रस्त ट्रव्हल्समध्ये ४० प्रवासी होते.
Nanded Accident: तिर्थयात्रेला निघालेल्या भाविकांच्या ट्रव्हल्सने कंटेनरला दिली धडक; 20 जखमी, चार गंभीर!
Nanded Accidentsakal
Updated on

प्रभाकर लखपत्रेवार

Latest Nanded News: तिर्थयात्रेला निघालेल्या भाविकांच्या ट्रव्हल्सने रविवारी (ता.२२) रोजी सायंकाळी कंटेनरला धडक दिली. यात २० भाविक जखमी झाले असून ४ जण गंभीर असल्याची माहिती ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

घटनेची माहिती समजताच आ. राजेश पवार यांनी रुग्णालयात भेट देवून जखमींना तातडीने नांदेडला हलविले. अपघाग्रस्त ट्रव्हल्समध्ये ४० प्रवासी होते.

मागच्या काही महिण्यापासून आ. राजेश पवार यांनी मतदारसंघातील मतदारांना तिर्थयात्रा घडवून आणत आहेत. रविवारी (ता.२२) रोजी सायंकाळी ४० महिला व पुरुष एम एच १२ एफ सी ९०१७ या ट्रव्हल्समधून मन्मथस्वामीच्या दर्शनाला निघाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.