नांदेड : गेल्या पंचवार्षिक योजनेपासून नांदड जिल्हा मध्यवर्ती बँकेतील संचालक मंडळातील दोन तालुके महिलांसाठी साखीव सोडण्यात येत आहेत. मागिल वर्षी २०१५-२० करिता जिल्ह्यातील धर्माबाद आणि माहुर या दोन तालुक्यासाठी जिल्हा बँकेची सोडत काढण्यात आली होती. साहजिकच यंदा सुद्धा ईश्वर चिठ्ठीद्वारे सोडत काढण्यात आली. यात २०२०-२५ साठी दोन तालुक्याची सोडत शनिवारी जाहीर झाली.
नांदेडच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील पाच वर्षासाठी का होईना पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष डॉ. सुनिल कदम यांचे काहीसा हिरमोड झाला आहे. यापूर्वी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांची संख्या फार कमी होती. त्यामुळे या बँकेत महिलांचा आवाज कधी काळीच कानी पडत असे,
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ सहा मे २०२० रोजी पूर्ण होत आहे. त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २०२०-२५ कालावधिसाठी संचालक मंडळाच्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी निवडणूका घेण्याचे निश्चित केले असून, नांदेड व हिमायतनगर ही दोन तालुके महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.
हेही वाचा- बाळाला जन्मतःच ‘का’ करावे लसीकरण : ते वाचलेच पाहिजे
शनिवारी (ता.१८ जानेवारी २०२०) रोजी दुपारी साडेबारा वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयात उपनिबंधक सहकारी संस्था व बँकेचे संचालक मंडळ सदस्य यांच्या उपस्थितीत श्लोक बालापूरे वय (दहा वर्ष) यांनी महिलांसाठी राखीव चिठ्ठी काढली. त्यानंतर वरील दोन्ही तालुके हे महिलावर्गासाठी राखीव सोडण्यात येत असल्याचे बँकेचे मुख्य कार्याकारी अधिकारी यांनी जाहिर केले.
१६ तालुक्यांतून काढली चिठ्ठी
२०१५-२० या पंचवार्षिक कालावधीसाठी १६ तालुक्यांमुधन चिठ्ठी काढण्यात आली होती. यात महिला संचालकासाठी धर्माबाद व माहुर ही दोन तालुके राखीव निघाली होती. २०२०-२५ मध्ये होत असलेल्या निवडणूकीसाठी महिला राखिव प्रतिनिधी जागेचे आरक्षण सोडत (धर्माबाद व माहुर तालुका वगळुन) हे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले.
हेही वाचलेच पाहिजे - विद्यार्थी म्हणतात, आश्रमशाळेतील जेवण नको रे बाबा...
असे आहे संचालक मंडळ
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य संख्या २१ असून, १६ तालुक्यात २१ मतदार संघ आहेत. या २१ मतदार संघातील पाच मतदार संघात बिगर शेती दोन आणि तीन मतदार संघ ओबीसी, एससी, एसटी साठी आहेत. अशा या मतदार संघात दर पाच वर्षाला दोन तालुक्यासाठी राखीव सोडण्यात येणार आहे.
|