नांदेड - कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्हा व तालुकास्तरावर कार्यकारी समिती व तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.
भारत सरकार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नियंत्रण आराखडा (Containmet Plan Covid 19) मधील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे. त्यानुसार कामाच्या अंमलबजावणीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
कार्यकारी समिती अशी राहणार
जिल्हास्तरीय कार्यकारी समितीचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विजय मगर, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत राजपाल पाटील, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन यांचा समावेश आहे. तर सदस्य सचिव जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे हे आहेत.
हेही वाचा - नांदेडच्या ‘या’ दोन आमदारांनी दिला निधी
तांत्रिक समितीत यांचा समावेश
जिल्हास्तरीय तांत्रिक समितीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत राजपाल पाटील, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन यांचा समावेश आहे. तर सदस्य सचिव जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे हे आहेत.
तालुकास्तरीय समिती अशी राहणार
तालुकास्तरीय कार्यकारी समितीचे उपविभागीय अधिकारी अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, संबंधीत तालुक्याचे वैद्यकीय अधीक्षक, मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत यांचा समावेश आहे. तर सदस्य सचिव तालुका वैद्यकीय अधिकारी हे आहेत. तालुकास्तरीय तांत्रिक समितीचे वैद्यकीय अधीक्षक अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून मुख्याधिकारी नगरपालिका/नगरपंचायत यांचा समावेश आहे. तर सदस्य सचिव तालुका वैद्यकीय अधिकारी हे आहेत.
हे ही वाचलेच पाहिजे - वर्तमानपत्रे आहेत समाजमनाचा आरसा
प्रभावी अंमलबजावणी करावी
वरील सर्व समितीने भारत सरकार आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा नियंत्रण आराखडा (कोविड 19 Containmet Plan) चा अभ्यास करावा. त्यानुसार नांदेड शहर आणि जिल्ह्यात सदर प्लॅनमधील तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि त्याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करावा, सदर आदेशास तत्काळ प्रभावाने अंमल देण्यात यावा, असे आदेशात नमुद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.