Nanded Crime : पाच लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त; नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Nanded Crime : नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य जप्तीला वेग दिला आहे. ४ नोव्हेंबर रोजी १४ ठिकाणी छापा टाकून ५ लाख ३३ हजार ६०० रुपयांच्या दारूची जप्ती करण्यात आली.
Nanded Crime
Nanded Crimesakal
Updated on

नांदेड : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेमध्ये अवैध मद्य जप्त करण्याची धडक कारवाई नांदेड जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. चार नोव्हेंबर रोजी विभागाने १४ ठिकाणी छापा टाकून एकूण ५ लाख ३३ हजार ६०० रुपयांच्या मुद्देमालाची दारू जप्त केल्याची माहिती नांदेडचे राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक गणेश पाटील यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.