हिंगोली : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी, मंगळवारी दिवसभर रिमझिम पाऊस झाला. आज सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत सरासरी १५.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २१.६९ टक्के पाऊस झाला आहे. नांदेडच्या जिल्ह्याच्या काही भागांतही पावसाची रिमझिम सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यात तालुकानिहाय गत २४ तासांत झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा ः हिंगोली २२, कळमनुरी ९.३९, वसमत १६.८०, औंढा १८.३०, सेनगाव १०.६०. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या रविवारपासून रिमझिम सुरू आहे.
या पावसाने काही ओढ्यांना पाणी आले होते. सखल भागात पाणी साचले. हिंगोली तालुक्यातील कोथळज- समगा मार्गावरील रेल्वे पटरीजळच्या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे.
कोथळजहून समगा येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. गैरसोय दूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा आहेच.
नांदेडमध्ये भीज पाऊस
नांदेड शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. आजही समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे खरिपातील पिकांना दिलासा मिळाला आहे. सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १५.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत सरासरी २०५.१० मिलिमीटर पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तो २३.०१ टक्के आहे.
उमरगा तालुक्यात संततधार
उमरगा : शहर व तालुक्यात दोन दिवसांपासून कमी - अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरु आहे. आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पावसाने कोवळ्या पिकांना आधार मिळाला आहे. रखडलेल्या पेरणीला गती मिळणार आहे.
उमरगा तालुक्यात १६ जुलैदरम्यानच्या काळात काही मोजक्या शिवार, गाव परिसरात दमदार पाऊस झाला. त्याचा पेरणीसाठी आधार मिळाला होता. साधारणतः तीस हजार हेक्टर क्षेत्रात कमी ओलाव्यावर पेरण्या झाल्या.
त्यानंतर पाऊस नसल्याने कोवळ्या पिकाला धोका निर्माण होत होता. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने कोवळ्या पिकाला आधार मिळाला आहे. सोमवारी (ता. १७) रात्री दहानंतर सुरू झालेला पाऊस आज रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.