Nanded News : गाव सोडून निर्मनुष्य ठिकाणी प्रवासी निवारे

राष्ट्रीय महामार्गावरील प्रकार प्रशासनाकडून पुन्हा चुकीचा कित्ता
nanded
nandedsakal
Updated on

माहूर - माहूर-किनवट तालुक्याच्या मध्यभागी धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असताना चुकीच्या ठिकाणी पुलाचे बांधकाम करून शेतकऱ्यांना बरबाद करून टाकलेल्या बांधकाम कंत्राटदार कंपनीने आता शेवटच्या टप्प्यातील कामे

उरकवण्याच्या दृष्टिकोनातून बांधत असलेले प्रवासी निवारे हे मुख्य प्रवासी थांबा किंबहुना बस थांब्यापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर निर्मनुष्य ठिकाणी तयार केले जात आहेत. अशा प्रवासी निवाऱ्याचा प्रवाशांना तीळ मात्र ही लाभ मिळणार नसून उलट हे प्रवासी निवारे शोभेची वस्तू बनवून महिला, वयोवृद्ध व तसेच दिव्यांग प्रवाशांना त्रासदायक ठरणारे आहे.

उच्च गती, अधिक सुरक्षितता, ड्रायव्हर आणि प्रवाशांसाठी आराम आणि सुविधा आणि वाहन चालविण्याचा खर्च कमी करण्यासाठी शिवाय जनतेच्या सोयी सुविधे करिता मंजूर झालेला कोठारी ते धनोडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ‘अ’ मागील चार वर्षाच्या कालखंडात प्रचंड त्रासदायक ठरला आहे.

nanded
Nanded News : जिल्ह्यात घरफोडी करणारा आरोपी मुद्देमालासह ताब्यात

चुकीच्या पद्धतीने एकाच वेळेला रस्त्याच्या दोन्ही बाजूस खोदकाम करून टाकल्यामुळे शेकडो अपघात झाले आहेत. त्यात अनेकांना आपला जीव गमावा लागला तर कित्येक जणांना कायमचे अपंगत्व सोसावे लागत आहे.

nanded
Beed News : पारगावला गांजाची शेती; २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

किनवट आणि माहूर या दोन्ही तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात अनेक तक्रारी झाल्या मात्र सर्वसामान्यांच्या समस्या विषयी काही एक देणे घेणे नसलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कुठल्याही तक्रारीची दखल अखेर पर्यंत घेतली नाही.

नाले, ओढ्यावर जुन्या पुला ऐवजी नवीन फुल बांधकाम करताना पुलाची जागा बदलल्याने पाण्याचा निचरा होऊ शकला नाही, त्यामुळे पुला जवळच्या हजारो हेक्टर शेतींचे पुराच्या पाण्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात सातत्याने नुकसान होत आहे.

nanded
Pune News : पुण्यात तीन परवाना निरीक्षक निलंबित

कोठारी ते धनोडा या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या सीमेंट रस्त्यानंतर अता गावापासून एक कि.मी.अंतरावर प्रवासी निवारे तयार होतांना दिसत आहेत. गाव सोडून इतक्या लांब अंतरावर कोणता प्रवासी बसेल हा यक्ष प्रश्न आहे, एक तर वृद्ध आणि महिलांसाठी एस.टी. प्रवासाकरीता महामंडळने सवलती दिल्या आहेत. त्यात गाव, फाटा, वाडी आणि तांडे सोडून दूरवर ओसाड जागी प्रवासी निवारा कशासाठी व कोणासाठी बांधल्या जात आहे.

- डॉ. मोफिक अहेमद खान, सामाजिक कार्यकर्ते, गोंडवडसा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()