Nanded News : नांदेडला सुविधांच्या बूस्टरची गरज! शासकीय रुग्णालयात रुग्णसंख्या वाढती, पुरेशा मनुष्यबळासह विविध समस्या

बऱ्याच दिवसांपासून व्यवस्थित स्वच्छता, साफसफाई झाली नसल्याचे वास्तव पाहायला मिळाले.
nanded
nandedsakal
Updated on

नांदेड - विष्णुपुरीतील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गेल्या ४८ तासांत ३१ जणांचा मृत्यू झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधितांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. असे असले तरी स्वच्छता, रुग्णांचे हाल, औषध साठा आणि अपुरे मनुष्यबळ आदी प्रश्न लक्षात घेता सध्या हे रुग्णालयच ‘व्हेंटिलेटर’वर असून परिपूर्ण सुविधांच्या ‘बूस्टर’ची गरज आहे. प्रशासनासह राज्य सरकारही सुस्त असल्याचे मंगळवारी केलेल्या पाहणीतून स्पष्ट दिसून आले.

रुग्णालयाचा परिसर मोठा आहे. बऱ्याच दिवसांपासून व्यवस्थित स्वच्छता, साफसफाई झाली नसल्याचे वास्तव पाहायला मिळाले. रुग्ण आणि त्यांच्यासोबतच्या नातेवाइकांमुळे रुग्णालयातील विविध विभाग आणि परिसर गर्दीने भरून जात आहेत. तुलनेत पुरेशा आरोग्य सुविधा, पुरेशा मनुष्यबळाचा अभाव दिसला. यावर राज्य सरकारने तातडीने दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे मत रुग्णांच्या नातेवाइकांनी व्यक्त केले.

अनेक पदे रिक्तच

रुग्णालयातील अनेक पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची कमतरता आहे. काहींच्या बदल्या झाल्या. मात्र, त्यांच्या जागी नवीन नेमणूक झाली नाही. जिल्हा नियोजन समितीतून मिळणाऱ्या निधीला तांत्रिक मान्यता मिळाली नसल्याने रुग्णालयासमोर आर्थिक संकट आहे. सीटी स्कॅन व इतर उपकरणांच्या देखभालीसाठी केलेल्या कराराचे पैसे दिले गेले नाहीत. त्यामुळे संबंधित सेवा पुरवठादारांनी देखभाल थांबवली आहे. येथील अनेक उपकरणे बंद पडली आहेत. रुग्णालयाची क्षमता पाचशे रुग्णांची असताना आज सुमारे एक हजार रुग्ण दाखल झालेले दिसले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

nanded
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

शासकीय रुग्णालयात सक्षम आरोग्यसेवेअभावी ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू होण्याची घटना गंभीर आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. सध्या याच रुग्णालयात सुमारे ६० ते ७० रुग्ण गंभीर अवस्थेत असून, सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करून त्यांचे प्राण वाचवावेत. आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी केली आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही. त्यामुळे सध्या कोणत्याही निष्कर्षावर जाणार नाही. चौकशीअंती सारे काही स्पष्ट होईल. सरकारने रुग्णालयाची स्थिती तातडीने सुधारली नाही तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण होईल.

अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री.

nanded
Chh. Sambhaji Nagar : शेकडो रिक्तपदांमुळे आरोग्य यंत्रणा जर्जर ; दोन ‘मल्टिस्पेशालिटी’चा प्रस्ताव शासनाने गुंडाळला

जिल्ह्यासह बाहेरहून गेल्या दोन दिवसांत अत्यवस्थ, चिंताजनक स्थितीतील रुग्ण जास्त प्रमाणात रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर आवश्यक ते ते सारे उपचार, देखभालीसाठी डॉक्टर व अन्य सहकारी लक्ष ठेवून आहेत. अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. अनेक वर्षांपासून हे रुग्णालय चांगली सेवा देत आहेत.

- डॉ. एस. आर. वाकोडे, प्रभारी अधिष्ठाता

रुग्णालयाची वाटचाल

१९८८ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास मान्यता.- १९८८ ते २०१२ पर्यंत ५०, २०१३ मध्ये शंभर, २०१९ मध्ये १५० प्रवेश क्षमता.

पदव्युत्तर (पीजी) विभागात १०८ विद्यार्थी

२००८ मध्ये ‘डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय’ असे नामकरण

विष्णुपुरी परिसरातील मोठ्या जागेत २०१५ मध्ये स्थलांतर

रुग्णांची संख्या मोठी

नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली, लातूर, यवतमाळ, वाशीम, तेलंगणातील निजामाबाद, आदिलाबाद, म्हैसा, बोधन आदी भागातील रुग्ण उपचारासाठी येतात

दररोज बाह्यरुग्ण विभागात १२०० ते १४०० रुग्ण

दररोज आंतररुग्ण विभागात १५० ते २०० रुग्ण

मंजूर बेड ५०८, व्यवस्था एक हजारपर्यंत

दररोज विविध ५० ते ६० शस्त्रक्रिया

आठशे ते एक हजार रुग्णांवर दररोज उपचार

मृत्यूचे प्रमाणही दररोज सरासरी सहा ते आठ

दृष्टिक्षेपात रिक्त पदे

तपशील मंजूर भरलेली रिक्त बदलीच्या

nanded
Pune News : पुण्यातील ससूनमधून पळालेल्या ड्रग्स पेडलर प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; पुणे पोलिसांनी...

पदे पदे पदे प्रतीक्षेत

प्राध्यापक २१ १६ ०५ ०३

सहयोगी प्राध्यापक ३८ ३१ ०७ ०१

सहायक प्राध्यापक ६६ ५६ १० ०१

परिचारिका ५८९ ३२६ २६३ ३०

तांत्रिक ५० ३८ १२ ००

अतांत्रिक २८ २४ ०४ ००

स्वच्छता कर्मचारी २४३ १२२ १२४ ७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.