नांदेड - पोहण्याचा आनंद घेणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. सध्या नांदेड शहरात दोन जलतरणिका (स्विमिंग पूल) आहेत. त्याचबरोबर महापालिकेचीही शांताराम सगणे जलतरणिका आहे. मात्र, तिचे नूतनीकरणाचे काम सुरु असून येत्या नवीन वर्षात अत्याधुनिक जलतरणिकेत पोहण्याचा आनंद घेता येणार आहे.
नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने सर्व सोयींनी युक्त असलेली अत्याधुनिक पद्धतीची शांताराम सगणे जलतरणिका तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील नियम व निकषानुसार बनविण्यात आलेल्या या जलतरणिकेचे नवीन वर्षात उद्घाटन करण्यात येणार आहे.
हेही आवर्जून वाचा...नांदेडमधील सोळा पंस सभापतींची निवड रद्द
४२ वर्ष जुनी जलतरणिका
श्रीगुरू गोविंदसिंघजी स्टेडीयमच्या जवळ असलेली शांताराम सगणे जलतरणिका ही ता. आठ जानेवारी १९७८ रोजी सुरू करण्यात आली. ४२ वर्षे जुनी असलेल्या या जलतरणिकेचे नुतनीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर करून त्याचे काम स्वान इन्फ्रा या कंपनीकडे देण्यात आले.
काम आले अंतिम टप्यात
जवळपास एक ते सव्वा कोटी रुपये खर्चून ही जलतरणिका अत्याधुनिक बनविण्याचे काम गेल्या आठ महिन्यांपासून सुरू आहे. या कामाची नुकतीच आयुक्त लहुराज माळी यांनी पाहणी केली. या वेळी उपायुक्त विलास भोसीकर, स्टेडीयम व्यवस्थापक रमेश चवरे, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता विश्वनाथ स्वामी, स्वानचे मोहमंद जुनेद आदी उपस्थित होते.
हेही आवर्जून वाचा...श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शन
ही आहेत जलतरणिकेची वैशिष्ट्ये
या जलतरणिकेत एकाच बॅचमध्ये साधारणतः शंभर ते दीडशे जण पोहू शकतात. या ठिकाणी २१ बाय ५० मीटरचा स्वीमिंग पूल असून त्याची क्षमता ३५ लाख लीटर पाण्याची आहे. तसेच दुसरा लहान मुलांना पोहण्यासाठी बेबी स्वीमिंग पूल तयार करण्यात आला आहे. आता नुतनीकरणामध्ये विविध पद्धतीचे नियोजन करण्यात आले असून जॉन्सन इंडोरा स्वीमिंग पूल टाईल्स बसविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आधुनिक पद्धतीच्या केमिकल्सचा वापर करण्यात आला आहे. फिल्टर हाऊसचा स्टॅडबाय सिस्टीमचा वापर करून नुतनीकरण करण्यात येत आहे.
राज्य, राष्ट्रीय स्पर्धांचा मिळाला मान
शांताराम सगणे जलतरणिकेत या पूर्वी तीन राज्यस्तरीय तसेच दोन राष्ट्रीय स्पर्धा झाल्या आहेत. तसेच १९८३ मध्ये सेऊल आॅलम्पिक स्पर्धेदरम्यान रशियाची टीमही या ठिकाणी येऊन त्यांच्या खेळाचे प्रदर्शन करून गेली आहे. दरवर्षी महापालिकेला यातून ५० लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळते. आता अत्याधुनिक पद्धतीने नुतनीकरण झाल्यानंतर त्यात आणखी वाढ होईल. सध्या या ठिकाणी दोन प्रशिक्षक आणि चार जीवरक्षक या ठिकाणी कार्यरत आहेत.
- रमेश चवरे, स्टेडीयम व्यवस्थापक, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.