नांदेडकरांनो आता ‘हे’ ऐका नाहीतर...

file photo
file photo
Updated on

नांदेड - नांदेडला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासनासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आता लॉकडाउन कडक करण्यात आले असून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची जबाबदारी नांदेडकरांची आहे. आता जर नांदेडकरांनी प्रशासनाचे ऐकले नाही तर मग संकट ओढवल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळेच ‘आपल्या घरी रहा, सुरक्षित रहा’ असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

मराठवाड्यातील एका टोकाला आणि तेलंगणा व कर्नाटकच्या सीमेवर असलेला जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे. कोरोनाचा जगभर फैलाव होत असताना देखील नांदेड जिल्ह्याने गेल्या महिनाभरापासून लाकडाउनची कडक अंमलबजावणी करत कोरोनाला जिल्ह्याच्या सीमेवरच थोपवून धरले होते. मात्र, काल बुधवारी कोरोनाचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे आता नांदेडकरांना सतर्क रहावे लागणार आहे. 

पहिल्या टप्प्यातील लढा यशस्वी
नांदेडला पहिल्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. जिल्हा प्रशासन, पोलिस, महापालिका, आरोग्य यासह सगळ्याच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी शर्तीचे प्रयत्न केले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी नियोजन केले आणि त्याला इतर सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. 

लोकप्रतिनिधींचीही मिळाली साथ
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात जिल्ह्यातील सर्वच नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी यांनी पक्षीय मतभेद आणि राजकारण बाजूला ठेऊन कोरोनाविरुद्ध लढा दिला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मोलाची साथ दिली. त्याचबरोबर खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील यांच्यासह आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांनी देखील वेळोवेळी लक्ष देऊन सहकार्य केले आणि नागरिकांनी देखील त्यांना साथ दिली. त्यामुळे महिनाभरात कोरोना विरुद्धचा लढा यशस्वीपणे लढता आला. आता दुसऱ्या टप्यातही हा लढा यशस्वी करायचा आहे.
 
हेही वाचलेच पाहिजे - नांदेडला पंजाबहून आलेल्या यात्रेकरुंचा प्रवासाचा मार्ग मोकळा...

नांदेडकरांची हवीय समर्थ साथ...
दुसऱ्या टप्यात नांदेड शहरातील पिरबुऱ्हाणनगरात एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे निश्‍चितच चिंतेचे वातावरण आहे. गेले महिनाभर एकही रुग्ण आढळला नसल्याने नांदेड जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, रुग्ण आढळल्याने आता आरेंज झोनमध्ये नांदेड जिल्हा आला आहे. आता पुन्हा कोरोनामुक्त आणि ग्रीन झोनमध्ये नांदेड जिल्हा येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. जिल्हा प्रशासन त्या दृष्टीने युद्धपातळीवर कामालाही लागले आहे. आता त्यांना नांदेडकरांची समर्थ साथ मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नांदेडकरांना फक्त एकच गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजे घरात आणि घरातच बसून रहायचे आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायचे आहे. एवढे केले तरी आपण पुन्हा कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू शकतो...ऐकले नाहीतर...    


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.