फोटो
फोटो

‘बेटी बचाव- बेटी पढाओ’ अभियानाला नांदेडच्या पित्याची बळकटी

Published on

अर्धापूर (जिल्हा नांदेड) : लग्नानंतर सासरी जाण्यासाठी हेलीकॉप्टर लावा असे लेकीचे स्वप्न पूर्ण करत तिची हेलीकॉप्टरमधून पाठवणूक केली. हे स्वप्न एका शेतकरी कुटूंबातील आल्लड मुलीने पहावे. ते स्वप्न  साकार करण्यासाठी भावाने व पित्याने धडपड करून पुर्ण करणे हा विषय जिल्ह्यात चर्चेचा व कुतूहलाचा ठरला आहे. प्रसारमाध्यमांत व समाजमन, सोशल मिडीयात चांगलाच कौतुकाचा विषय ठरला आहे. शेतकरी पित्याने आपल्या लेकीची स्वप्न पुर्ण करण्यासाठी चक्क हेलीकॅप्टर बुक केले. वधू- वरांची पाठवणी हेलीकॅप्टरमधून केली. यामुळे बेटी बचाव, बेटी पढाओ अभियानाला खुप मोठे बळ मिळाल्याची चर्चा आहे. तर अनेक वधू पित्याकडून हेलीकॅप्टरच्या खर्चाविषय विचारणा सुरु केली आहे. गेल्या दशकातील हा एकमेव गाजलेला विवाह सोहळा म्हणुन या विवाह सोहळ्याकडे पाहिले जात आहे.

वधू पित्याकडून कोणतीही कसूर न ठेवता पुर्ण केली.

विवाह सोहळा हा प्रत्येकांच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो. तो भव्यदिव्य कसा होईल याकडे विशेष लक्ष दिले जात असते. शेतकरी व कष्टकरी कुटूंबातील एका मुलीने हेलीकॅप्टरने आपली पाठवणूक व्हावी असे स्वप्न पाहिले ते पुर्ण करण्यासाठी वधू पित्याकडून कोणतीही कसूर न ठेवता पुर्ण केली.

नववर महावितरण कंपनीत अधिकारी

कोंढा (ता. अर्धापूर) येथील शेतकरी कुटूंबातील शिल्पा कदम हिचे शिक्षण विज्ञान शाखेत पदवित्तर   झाले. त्यांचा विवाह उखळी येथील मोहन गायकवाड यांच्याशी ठरला. त्यांचे शिक्षण संगणक शाखेत पदवित्तर झाले आहे. ते सध्या बीड येथे महावितरण कंपनीमध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या वधू वरांचा विवाह सोहळा जिल्हाभर गाजला तो हेलीकॅप्टरने पाठवणूकीने.
विलास कदम यांचे शेतकरी कुटूंब आहे. त्यांना दोन मुली एक मुलगा आहे. त्यांनी शेती करीत आपला विकास साधला. तसेच पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे विशेष लक्ष दिले. शेतक-यांच्या जीवनात आनंदाचे क्षण कमीच येतात. ते आनंदाचे क्षण अविस्मरणीय कसे होतील यासाठी प्रयत्न केला जातो.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा

शेतकरी हा जगाचा पोशिंदा. या पोशिंद्याने आगळा वेगळ्या पध्दतीने विवाह सोहळा केल्याने एक चांगला संदेश दिला आहे. लेकीच्या जन्माने ज्यांच्या कपाळावर आठ्या पडतात अशांसाठी एक चांगला संदेश आपल्या कृतीमधून विलास कदम यांनी दिला आहे. त्यांना राम कदम, श्याम कदम आजोबा नारायण कदम यांनी खूप मोठे सहकार्य केले. जिल्ह्यातील शेतकरी कुटूंबातील हा अलीकडच्या काळातील एक वेगळा विवाह सोहळा ठरला. हेलीकॅप्टरचा खर्च किती येतो, कोण कोणत्या परवाणग्या काढाव्या लागतात ,कुठे मिळते याची चौकशी सुरू झाली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.