लातूर : कोविड १९ चा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊन काळात निवृत्तीवेतनधारक आणि संजय गांधी व इतर शासकीय योजनेतील लाभधारकांना घरपोच सेवा द्यावी अशी सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी राष्ट्रीयकृत बँकांना केली होती. ही सूचना बँकांनी मान्य केली असून त्यासाठी शहराच्या निरनिराळ्या भागात विविध संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे.
लॉकडाऊन काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. स्वतःचे वाहन घेऊनही घराबाहेर पडता येत नाही. बँकेत जाऊन पैसे काढता येत नाहीत. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार निवृत्तीवेतन धारकांच्या वतीने पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती. निवृत्तीवेतनधारकांच्या या तक्रारींची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री देशमुख यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे व आयुक्त टेकाळे यांच्याशी संपर्क करून हे गैरसोय दूर करण्याच्या सूचना केल्या होत्या.
सोमवारी महापौर आणि आयुक्त यांनी या संदर्भाने राष्ट्रीयकृत बँक अधिकार्यांशी संपर्क करून त्यांची बैठक घेतली. या बैठकी दरम्यान निवृत्तीवेतनधारक तसेच शासकीय योजनेतील लाभधारकांना घरपोच सेवा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी संबंधित बँकाकडून शहराच्या निरनिराळ्या भागात विविध संस्थामार्फत संपर्क प्रतिनिधी नेमले असून त्यांचा संपर्क पत्ता आणि फोन नंबर जाहीर करण्यात आले आहेत. लाभधारकांनी या प्रतिनिधींना संपर्क केल्यास त्यांना हवी ती रक्कम घरपोच मिळणार आहे.
बँक ऑफ बडोदा - राकेश (९५३५२७५०६८) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रशांत भाटगावे (जुना औसा रोड, ८६०५५९६४५९), शुभम राऊत (चंद्रनगर, ९४०४७२००२७०, राजेंद्र देबडवार (बार्शी रोड, ९०९६३२७२४०), निलेश पोलकेवार (शिवनगर,९४२३३४६६०४), पिराजी सुर्यवंशी (म्हाडा कॉलनी, ९७६७७८७६२४), मनोज काळे (विवेकानंद चौक ९७६६९११२९२) हे संपर्क प्रतिनिधी असणार आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया- किशोर वाहने (८२३७७७९९०१) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकृष्ण कुलकर्णी (आदर्श कॉलनी, ८७८८४०१०६७), ऋषिकेश पांडे (औसा रोड, ९९७०८४९५०३), अमोल जोशी (आदर्श कॉलनी, ९४२११९५१२३), विद्या तोडकर (आंबेजोगाई रोड, ९८६०२०८६६०), नितीन कांबळे (आर्वी, ८३८१०७२८१०) हे संपर्क प्रतिनिधी राहणार आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र - सुनील जेजूरकर (९९७०७२९९४०) हे नोडल ऑफिसर राहणार आहेत. अमर पिंपरे (८३२९७३३३२१), दिलीप हांडे (९५०३११०१०१), सुरेश गवळी (९८६०१३१३४२), केशव भांगिरे (९०२१४२६९२६) सर्व लातूर हे संपर्क प्रतिनिधी राहणार आहेत.
यांच्या फोन नंबरवर निवृत्तीवेतनधारक आणि शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांनी फोन केल्यास त्यांना हवी असलेली रक्कम घरपोच मिळणार आहे. याचा संबंधीतांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By Pratap Awachar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.