जेवळी (जि.उस्मानाबाद) : वडगाव गांजा (ता. लोहारा) (Lohara) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (Nationalist Congress Party) सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस हणमंत दणाने (वय ३६) यांनी शनिवारी (ता.२५) गळफास घेऊन अत्महत्या केल्याप्रकरणी त्यांच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोट व वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी (ता.२६) पहाटे तीन आरोपीविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा (Osmanabad) दाखल झाला असून पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केले आहे. या बाबत पोलिसां दिलेली माहिती अशी की, वडगाव (गांजा) येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस तथा वडगाव येथील गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हणमंत दणाने हे राजकीय क्षेत्रात काम करीत असताना गावातीलच मायादेवी दत्तात्रय गायकवाड या महिलेशी ओळख झाली होती. ही महिला गावात अंगणवाडी सेविका म्हणून कामाला आहे.
या ओळखीतूनच त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. या महिलेला दीड लाख रुपये दिले होते. पुढे दिलेल्या पैशाची मागणी केली असता त्या महिलेनी पैसे देण्यास टाळाटाळ करू लागली. यात वादही झाला. हा वाद गावातील नागरिकांनी मिठविण्याचा केला, परंतु काही दिवसांपूर्वी पैसे मागितले म्हणून सदरील महिला, तिचा पती व मुलीने हणमंत दणाने यांना मारहाण केली होती. यामुळे ते मानसिक तानतनावाखाली राहत होते. यातच गुरुवार (ता.२४) दणाने हे मायादेवी हिला चार अपत्य असल्याने तिच्याविरुद्ध चौकशी व कार्यवाहीसाठी वडगाव येथे उपोषणाला बसले होते. याबाबत प्रशासकीय अधिकारी यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेतले होते. परंतु शनिवार (ता२५) सकाळी नऊ वाजता ते नेहमी प्रमाणे चौकातील संपर्क कार्यालयात गेले होते. याच संपर्क कार्यालयातील छताच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला.
यावेळी पोलीसांना यांच्या टेबलावर सुसाईड नोट सापडली असून आहे या चिठ्ठीमध्ये तिघांचे नावे आहेत. यात त्यांच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे माझ्या मृत्यूस हेच लोक कारणीभूत आहेत. तरी पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी. ही नम्र विनंती असा मजकुर लिहून शेवटी सही केलेली आहे. त्यांच्याकडे सापडलेल्या या सुसाईड नोट व मृताचे वडील प्रभाकर रामा दनाने (वय ६५) यांच्या फिर्यादीवरून आरोपी मायादेवी दत्तात्रय गायकवाड, तिची मुलगी स्वाती दत्तात्रय गायकवाड पती दत्तात्रय कचराप्पा गायकवाड (सर्व रा. वडगाव (गांजा ता. लोहारा) यांच्याविरुद्ध आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी रविवारी (ता.२६) पाहाटे या तिन्ही आरोपीविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केले असून या प्रकरणाची तपास लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे हे करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.