Navratri Festival : मत्स्योदरी देवीचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन; नवस फेडण्यासाठी गर्दी यात्रोत्सवात प्रचंड गर्दी, पोलिसांचा कडक बंदोबस्त

मत्स्योदरी देवीचे मंदिर डोंगराच्या कुशीत वसलेले आहे.
navratri
navratrisakal
Updated on

अंबड - जिल्ह्यातील अंबड शहरातील मत्स्योदरी देवीचे सातव्या माळेला (शनिवारी) मनःकामना, नवस फेडण्यासाठी मराठवाड्यातून आलेल्या हजारो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. नवरात्र उत्सवात लाखो भाविक येथे हजेरी लावतात. पाचवी, सातवी माळ, कोजागिरी पौर्णिमेला देवीदर्शनाला विशेष महत्त्व असते.

यामुळे नवरात्रात दूरवरून भाविक मोठ्या भक्तीभावाने येथे हजेरी लावतात. मत्स्योदरी देवीचे मंदिर डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. डोंगराचा आकार मत्स्य आकाराचा असल्याने देवीला मत्स्य म्हणजे मासा व उदर म्हणजे पोट या अर्थाने देवीचे नाव मत्स्योदरी असे पडल्याची आख्यायिका आहे. शनिवारी (ता.२१) सातव्या माळेला मत्स्योदरी देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासून मंदिरात भाविकांनी रांगा लावल्या होत्या. संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

भजन, कीर्तन, प्रवचन, आरती, गोंधळ, जागर आदी कार्यक्रमांचा यात समावेश होता. दरम्यान परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून ज्येष्ठ आणि दिव्यांगांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी देवीच्या गाभाऱ्यापर्यंत लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

navratri
Navratri 2023 : आठवी माळ, भगवान महादेवांनी चेष्टा केली म्हणून देवी पार्वतीला मिळालं महागौरी रूप

अनेकांनी फेडले नवस

सातव्या माळेला येथे मोठी यात्रा भरली होती. पुजा साहित्यासह खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने, कटलरी, ज्वेलरी, रहाट पाळणे, लहान मुलांची खेळणी विक्रेत्यांनी येथे दुकाने थाटली आहेत. अनेक भाविकांनी आपली मनःकामना पूर्ण करण्यासाठी, देवीला केलेला नवस फेडण्यासाठी प्रत्येक पायरीला नारळ फोडून व लहान मुलाला झोळीत टाकून नवस फेडले.

navratri
Navratri Festival 2023 : नवरात्र महोत्सवात देखावे पाहण्यासाठी मंगळवेढ्यात मोठी गर्दी

भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मत्स्योदरी देवी संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार तथा सचिव धनश्री भालचिम यांच्या मार्गदर्शनात पुजारी तथा विश्वस्त गीताविलास खुंटेफळकर, व्यवस्थापक कैलास शिंदे, दिवाकर जोगलादेवीकर यांच्यासह स्वयंसेवक आणि भाविकांनी पुढाकार घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()