Navratri 2023 : अंबडला नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी; मत्स्योदरी देवी मंदिरात सुशोभीकरणासह रंगरंगोटी

मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मत्स्योदरी देवी नवरात्र महोत्सवाला रविवारपासून प्रारंभ
navratri festival preparation in ambad matsyodari devi temple yatra jalna
navratri festival preparation in ambad matsyodari devi temple yatra jalnaSakal
Updated on

अंबड : मराठवाड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मत्स्योदरी देवी नवरात्र महोत्सवाला रविवारपासून (ता.१५) प्रारंभ होत आहे. यानिमित्त मत्स्योदरी देवी संस्थानच्या वतीने मंदिराची साफसफाई, स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदाही मंदिराच्या परिसरात मोठी यात्रा भरणार आहे.

मत्स्योदरी देवी संस्थानच्या वतीने सध्या मंदिर परिसरात विविध कामे केली जात आहेत. मंदिरावर विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. संस्थानच्या वतीने भाविकांसाठी सुसज्ज भक्तनिवास, पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था, रांगेचे नियोजन, स्वच्छतागृह, वाहनतळ आदी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहे.

घटस्थापनेपासून महिला देवीच्या मंदिरासमोर घटी बसतात. त्यांच्यासाठीही भक्तनिवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. यात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी तसेच चोरीच्या घटना, अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर व परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.

याचबरोबर स्वच्छता व साफसफाईसाठी पालिकेचे कर्मचारी तैनात असतील, असे तहसीलदार तथा मत्स्योदरी देवी संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत शेळके, नायब तहसीलदार तथा सचिव धनश्री भालचिम, व्यवस्थापक कैलास शिंदे यांच्यासह विश्वस्त मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

navratri festival preparation in ambad matsyodari devi temple yatra jalna
Navratri Festival 2023 : खापा शहरातील ३०० वर्षे जुन्या भवानी मंदिरात नवरात्रोत्सव

भाविकांच्या सेवेसाठी स्वयंसेवक

मत्स्योदरी देवी नवरात्र महोत्सवादरम्यान भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे. पायरीवर नारळ फोडणे, दर्शनासाठी रांगा लावणे, वृद्ध, अंध,अपंग यांना मदतीचा हात देणे याचबरोबर भाविकांचे पादत्राणे यांची देखभाल करणे, लहान मुले हरवल्यास शोधून आईवडील,

नातेवाईक यांच्याकडे पोहच करणे आदी भूमिका पार पाडण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ७५ विद्यार्थी,१० शिक्षक,कर्मचारी तर मत्स्योदरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी प्राचार्य डॉ.शहाजीराव गायकवाड व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ.रविराज कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकाच्या भूमिकेत सेवा अर्पण करणार आहेत.

navratri festival preparation in ambad matsyodari devi temple yatra jalna
Jalna Water Crisis : पाणीबाणीचे संकट; १६ गावांसह १३ वाड्यांना सध्या २८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

चोख पोलिस बंदोबस्त असणार

मत्स्योदरी देवी नवरात्रोत्सव काळात अंबडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत व पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यात पोलिस अधिकारी,कर्मचारी, महिला पोलीस,गृहरक्षक दलाचे जवान तैनात असतील.

लिफ्टची व्यवस्था

मत्स्योदरी देवीच्या मंदिरात दर्शन सुलभ व्हावे, पायऱ्या चढाव्या लागू नयेत यासाठी वृद्ध, अंध, अपंग, आजारी यांच्यासाठी लिफ्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.