नायगाव - राज्यातील महायुतीचे सरकार धोकेबाज व खोकेबाजांचे आहे यांना सत्तेतून हाकालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मतदारांनो भाजपच्या खोट्या आश्वानाला बळी पडू नका. काँग्रेसची निशाणी हात आहे हातात मशाल घ्या व तुतारी वाजवून गद्दारांना हद्दपार करा असे आवाहन काँग्रेसचे खा. इमरान प्रतापगढी यांनी केले आहे.