पोलिसांच्या मदतीला ‘राकाँ’चे पदाधिकारी धावले

sengaw photo
sengaw photo
Updated on

सेनगाव (जि. हिंगोली) : कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू आहे. मात्र, नागरिकाकडून गांभीर्याने घेणे गरजेचे असताना एकत्र येऊन गर्दी केली जात आहे. पोलिस प्रशासन जीव धोक्यात घालून उपाययोजनेसाठी पुढाकार घेत आहे. पोलिसांना मदत व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला पेट्रोलिंग करण्यासाठी चार वाहने डिझेलसह रविवारी (ता. ३०) उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

सेनगाव पोलिस ठाणे अंतर्गत ६४ गावांचा समावेश आहे. पाच बिट असून येथील ठाण्याकडे दोन वाहने आहेत. कोरोना विषाणुजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाकडून शहरासह विविध गावांत वाहनांद्वारे पेट्रोलिंग केली जात आहे. पोलिसांचे वाहन येताच विविध प्रभागांतील नागरिक एकत्र ठिकाणी थांबलेले घरात पळून जात असल्याचे चित्र आहे.

पोलिस प्रशासनाला मदत करण्याचा निर्णय

 वाहन निघून जाताच परत गर्दी करत आहेत. हा प्रकार अत्यंत धोकादायक ठरण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन पोलिस प्रशासनाला मदत करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र गडदे, नगराध्यक्ष संदीप बहिरे, नगरसेवक उमेश देशमुख, कैलास देशमुख यांनी स्वखर्चातून चार बोलेरो वाहने डिझेलसह पेट्रोलिंग करण्यासाठी उपलब्ध करून दिली आहेत. 

लाऊडस्पीकरची व्यवस्था

ही वाहने पोलिस निरीक्षक सरदारसिंग ठाकूर, सहायक पोलिस निरीक्षक बाबूराव जाधव, अभय माखणे, पोलिस कर्मचारी अनिल भारती, महादेव शिंदे यांच्या स्वाधीन केली आहेत. दरम्यान, या वाहनांवर नागरिकांना सूचना देण्यासाठी लाऊडस्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांची सेनगाव पोलिसांना लाॅकडाउन यशस्वी करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे

चार बोलोरो वाहने डिझेसह दिली

एक जबाबदार राजकीय पदाधिकारी म्हणून आमच्याकडून काय करता येईल, या बाबत पोलिस ठाण्यात जाऊन चर्चा केली. त्‍यानंतर पेट्रोलिंगसाठी वाहनांची उणीव लक्षात आल्याने वाहने देण्याचा निर्णय घेतला. स्‍वखर्चाने तत्‍काळ चार बोलोरो वाहने डिझेसह उपलब्ध करून दिली. बऱ्याच गावांतील गावकरी कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत. वीस ते पंचवीस गावकरी एकत्र बसत आहेत. त्या गावांसाठी हे अत्यंत धोकादायक आहे. या ठिकाणी वेळेवरच पोलिस पथक पोचणे अत्यंत गरजेचे असल्याने तो निर्णय घेण्यात आला.
-उमेश देशमुख, नगरसेवक

धान्याचे वाटप करण्याची मागणी

सेनगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन असल्यामुळे भूमिहीन व मजुरांच्या हाताला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे बेरोजगारांसाठी धान्य वाटप करण्याची मागणी मदन कांबळे, समाधान गायकवाड, पिणू वाघमारे, सचिन सुतार, संदीप कांबळे, शिवाजी वैरागड, कचरू खडसे, संदीप जाधव, बेबीबाई खिल्लारे, विमल ठोके, सागर जाधव, बाळू खरात, अविनाश सुतार, सुदाम वाघमारे, संजय वाघमारे, विनोद वाघमारे यांच्यासह ७८ नागरिकांनी तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ११ व १६ मधील बहुतांश नागरिक भूमिहीन आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.