बीड : शरद पवार यांची काल बीड येथे स्वाभिमान सभा पार पडली. यावेळी खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि चाहते उपस्थित होते. धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील बबन गित्ते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र या कार्यक्रमासाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी बीडच्या सभेतून जोरदार शक्तीप्रर्दशन केलं. पवारांच्या या सभेला हजारोंची गर्दी जमली होती. पण यानंतर भाजपच्या प्रकाश गाडे यांनी काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने पैसे देऊन ही गर्दी जमवल्याचा आरोप केला आहे.
सदर व्हिडिओमध्ये, एक महिला इतर महिलांना पैसे वाटताना दिसत आहे. पैसे वाटताना त्या फोटोही काढून घेत आहेत. एक महिला वहीवर नावे लिहून घेत असून हा प्रकार एका भिंतीच्या पाठीमागे उभा असलेल्या काही लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला आहे.
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर पवारांच्या गटात
राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार यांच्या रूपाने बंड झाल्यानंतर पक्षात उभी फूट पडली होती. तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतरही अजित पवारांनी शरद पवारांची दोन ते तीन वेळा भेट घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी भाजपसोबत कधीच जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. बीडचे आमदार संदीप क्षिरसागर यांनी शरद पवारांचा हात धरून पुढे जायचं ठरवलं.
धनंजय मुंडे यांच्यासाठी आव्हान देणारा नेता
काल झालेल्या सभेत परळी मतदारसंघातील बबन गित्ते यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे दोघेही सत्तेत असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत परळीचे तिकीट कुणाला मिळणार याकडे लक्ष असणार आहे.
त्याचबरोबर या दोघांना टक्कर देण्यासाठी शरद पवार गटाचे बबन गित्ते हे सुद्धा मैदानात उतरणार का हेही पाहावं लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.