Lok Sabha Election : सात उमेदवार ठरले, बाकी तीन जागांवर काय? शरद पवारांनी दिली माहिती

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत.
NCP Sharad Pawar on Lok sabha election 2024 seat allocation NCP got 10 seats in Maha Vikas Aghadi
NCP Sharad Pawar on Lok sabha election 2024 seat allocation NCP got 10 seats in Maha Vikas Aghadi
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १० जागा मिळाल्या आहेत. यातील ७ जागांचे उमेदवार निश्चित झाले असून, उर्वरित ३ जागांवरचे उमेदवार दोन दिवसात घोषित केले जातील, अशी माहिती पक्षप्रमुख शरद पवार यांनी दिली. इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाविकास आघाडीतील जागा निश्चिती झाल्यानंतर आता काही ठिकाणी उमेदवारीची घोषणा बाकी आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडील तीन मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कायम आहे. यात रावेर, माढा आणि सातारा मतदारसंघाचा समावेश आहे. साताऱ्यातून आमदार शशिकांत शिंदे यांच्या नावावर एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे यांनी प्रचाराची सुरुवातही केली आहे. त्यांच्या उमेदवारीची केवळ औपचारिकता बाकी आहे.

NCP Sharad Pawar on Lok sabha election 2024 seat allocation NCP got 10 seats in Maha Vikas Aghadi
Loksabha Diary : नक्षली कुरापती थांबल्या तरी मोहाशिवाय पर्याय नाही... छत्तीसगडच्या सीमेवरील गाव कोणत्या मुद्द्यावर करणार मतदान?

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर आहे. तसेच संजिवराजे निंबाळकर यांनाही उमेद्वारी मिळावी, अशी मागणी आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांचे नाव पुढे आले आहे. या तिन्ही मतदार संघात नेमक्या कोणत्या नावावर राष्ट्रवादी शिक्का मोर्तब करणार, हे पुढील दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

NCP Sharad Pawar on Lok sabha election 2024 seat allocation NCP got 10 seats in Maha Vikas Aghadi
Prakash Ambedkar : 'मविआ'चं ठरलं! पण प्रकाश आंबेडकरांकडून उद्धव ठाकरेंना 'या' अपेक्षा; थेटच बोलले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.