उमरगा - नीट परीक्षा पेपर फुटीचे कनेक्शन धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याशी असल्याचे स्पष्ट होत आहे.
या प्रकरणी नांदेड ‘एटीएस’ने रविवारी (ता.२३) लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात उमरग्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
इराण्णा मष्णाजी कोनगुलवार असे गुन्हा दाखल झालेल्याच नाव आहे.
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये गटनिदेशक पदावर तो कार्यरत आहे. तो देगलूरचा (जि. नांदेड) रहिवासी आहे. लातूर येथील महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकरी करून तो एक वर्षापासून येथे नोकरीस आहे.
‘नीट’ च्या परीक्षेदम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर बिहार, गुजरात, पंजाब, हरियाना पेपर फुटी प्रकरणात तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. दरम्यान ‘एटीएस’ने लातूर कनेक्शनचा उलगडा केल्याने एका शिक्षकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या मोबाईल व लॅपटॉपमधील विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट, काही नोंदी व आर्थिक व्यवहार दिसून आल्याची सूत्रांची माहिती आहे.
यात दोन्ही शिक्षक हे उमरगा येथील इरन्ना कोनगुलवार यांच्या संपर्कात होते. कोनगुलवार हा दिल्लीच्या एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते. पैशांच्या व्यवहारात कोनगुलवार याच्याबाबतीत चर्चा होत आहे.
दोन शिक्षक हे पैशांच्या मोबदल्यात नीट परीक्षामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी कोनगुलवार यांच्या संपर्कात होते. तर कोनगुलवार हा दिल्ली येथील आरोपी गंगाधर यांच्या संपर्कात होता. पैशांच्या व्यवहारातून नीट परीक्षाचा प्रवेश मिळवून देण्याचे काम संबंधित करीत होते, अशी सूत्रांची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.