Phulambri News : सीमंत कुटुंबीयांनी साठ वर्षाची जोपासली वडिलोपार्जित परंपरा! न्युज पेपर एजन्सीच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल

फुलंब्री तालुक्यात मागील तब्बल साठ वर्षापासून पेपर विक्रेत्यांची अविरत सेवा सुरू आहे.
Dhananjay Simant
Dhananjay Simantsakal
Updated on

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यात मागील तब्बल साठ वर्षापासून पेपर विक्रेत्यांची अविरत सेवा सुरू आहे. ऊन, वारा, पाऊस व थंडीची तमा न बाळगता पेपर विक्रेत्याची अविरत सेवा बजावून घराघरात पेपर टाकण्याचे काम सीमंत कुटुंबीय साठ वर्षापासून सोपासले आहे. २६ मार्च १९६३ रोजी कै. बाबुराव सीमंत यांनी रेणुका न्युज एजन्सी सुरू केली होती. त्यांचा मुलगा धनंजय सीमंत यांनी वडिलोार्जित सेवा देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

सीमंत कुटुंबीयांची तिसरी पिढी पेपर विक्रेत्यात उतरली आहे. त्यामुळे या रेणुका न्यूज एजन्सीच्या माध्यमातून वर्षाला सुमारे 12 ते 14 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती न्युज पेपर विक्रेते धनंजय सीमंत यांनी मंगळवारी (ता.१५) रोजी सकाळी शी बोलताना दिली.

फुलंब्री तालुक्यात मागील गेल्या साठ वर्षापासून सीमंत कुटुंबीयांच्या वतीने न्यूज पेपर विक्रेत्याचे काम केले जात आहे. कै. बाबुराव सीमंत यांनी 26 मार्च 1963 रोजी रेणुका न्यूज एजन्सी स्थापन करून अधिकृत पेपर विक्रेते म्हणून व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यावेळी न्युज पेपर एजन्सीसाठी पन्नास रुपये डिपॉझिट भरावे लागत होते. मात्र घरची परिस्थिती हालाकीच असल्याने पन्नास रुपये भरणे त्यांना शक्य नव्हते.

त्यामुळे मित्र परिवाराच्या मदतीने त्यांनी रेणुका न्युज एजन्सी सुरू करून पन्नास रुपये उसनवारी करीत डिपॉझिट भरले होते. 1963 पासून बाबुराव सीमंत यांनी घराघरात न्यूज पेपर पोहोचविण्याचे काम केले आहे. त्यानंतर त्यांचा मुलगा धनंजय बाबुराव सीमंत यांनी वडिलांनी स्थापन केलेल्या रेणुका न्यूज एजन्सीला अविरतपने सुरू ठेवण्यासाठी सातत्याने शर्तीचे प्रयत्न केले आहे.

ऊन, पाऊस, वारा, थंडी घरातील सुख, दुःख बाजूला सावरून दररोज नित्यनेमाने वाचकांसाठी तत्पर राहून घराघरात न्यूज पेपर पोहोचविला आहे. 26 मार्च 1963 ते आजपर्यंत ही सेवा अविरतपणे सुरू असून तब्बल साठ वर्षानंतरही वडिलोपार्जित परंपरा धनंजय सीमंत यांनी जोपासले आहे. आता या रेणुका न्यू एजन्सीचा वर्षाकाठी तब्बल बारा ते चौदा लाख रुपयाची उलाढाल होत असल्याची माहिती पेपर विक्रेते धनंजय सीमंत यांनी दिली.

कोरोनातही अविरत सेवा सुरूच

कोरोना काळात संपूर्ण देश लॉकडाऊन होता. त्यावेळी घराच्या बाहेर निघणे शक्य होत नव्हते. जवळच्या एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला तर त्याला पाहण्यासाठी सुद्धा रक्ताच्या नात्यातील व्यक्ती जात नव्हते. मात्र अशा कठीण काळात घराघरात पेपर पोहचविण्याचे काम धनंजय सीमंत यांनी केले आहे. पेपरच्या माध्यमातून उपाययोजनासह नियमवली वाचकांना समजत होती. तसेच दररोज आलेले पेपर निर्जंतकीकरण करून वाचकाला पेपर पासून कोरोनाचा काही धोका होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली होती. त्यामुळे पेपर विक्रेत्यांचे कार्य समाजात मोठे आहे.

वृत्तपत्राला तिसऱ्या पिढीचे योगदान

फुलंब्री तालुक्यात वृत्तपत्राला सीमंत कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे योगदान लाभत आहे. सुरवातीला कै.बाबुराव सीमंत यांनी २६ मार्च १९६३ रोजी रेणुका न्युज एजन्सी स्थापन केली. त्यांनतर कालांतराने बाबुराव सीमंत यांची दुसरी पिढी धनंजय सीमंत यांनी वृत्तपत्र विक्रीला मोठे योगदान दिले आहे. आता पुन्हा तिसऱ्या पिढीच्या रूपाने धीरज सीमंत व सूरज सीमंत हे न्युज पेपर विक्रीला मोठे योगदान देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.