Nilanga Accident News : कंटेनर-दुचाकी धडकेत तिघांचा मृत्यू ; निलंगा तालुक्यातील झरी येथील घटना,वाहतूक तीन तास ठप्प

कंटेनरने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील चुलती-पुतण्यासह तिघे ठार झाल्याची घटना उदगीर- निलंगा मार्गावरील झरी (ता. निलंगा) येथे गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. धडकेनंतर कंटेनर उलटला.
latur
latursakal
Updated on

निलंगा : कंटेनरने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील चुलती-पुतण्यासह तिघे ठार झाल्याची घटना उदगीर- निलंगा मार्गावरील झरी (ता. निलंगा) येथे गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. धडकेनंतर कंटेनर उलटला.

latur
Latur (Nilanga) News: वीस कोटींच्या निधीतून निलंगा शहरात होणार विविध विकासकामे

झरी येथील कृष्णा अर्जुन जाधव (वय २२), त्यांची चुलती कस्तुराबाई परमानंद जाधव (३८) हे आठ दिवसांपूर्वीच खरेदी केलेल्या मोटारसायकलवरून शेताकडे दूध काढण्यासाठी जात होते. यावेळी कंटेनरने मोटारसायकलला धडक दिली. त्यात पुतण्यासह चुलती जागीच ठार झाली. याच दरम्यान या रस्ताने जाणाऱ्या अक्षरबाई किशन सूर्यवंशी (वय ५५) हिला दोन्ही वाहनांची धडक बसली. त्यात तिचा मृत्यू झाला. धडकेनंतर कंटेनर उलटला. तिघेही कंटेनरखाली अडकले होते.

अपघातामुळे उदगीर-निलंगा मार्गावरल वाहतूक सुमारे तीन तास बंद होती. पोलिसांनी दोन क्रेन, एका जेसीबीच्या साह्याने उलटलेला कंटेनर बाजूला केला आणि वाहतूक सुरळीत केली. कंटेनरसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

latur
Latur : शिक्षणातील मूल्यव्यवस्था उद्‍ध्वस्त ; डॉ. जयद्रथ जाधव यांचे मत,शासनाची धोरणे कारणीभूत

तिघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले. पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाईचे आदेश दिले. अर्जुन वामनराव जाधव (रा. झरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनरचालक माधव प्रभू घोडके (४० रा. जवळगा, ता. देवणी) यांच्यावर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.