निलंगा - निलंगा मतदारसंघातील देवणी येथे निकालाआधीच माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विजयाचे बॅनर झळकत आहेत. कार्यकर्त्यांनी हे बॅनर विजयी भव म्हणून लावले आहे. या बॅनरची सर्वत्र मोठ्या उत्साहाने चर्चा सुरू आहे..निलंगा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर तर महाविकास आघाडीकडून तर महाविकास आघाडीतर महाविकास आघाडीकडून अभय साळुंके अशी दुरंगी लढत झाली..प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आणि घडामोडी झाल्या असल्या तरी प्रत्येकाकडून जातीय समीकरण स्थानिक प्रश्न विकासासाठी आणलेला निधी अशा विविध मुद्द्यावर ही निवडणूक गाजली असली तरी निलंगा विधानसभा मतदारसंघ हा अतिशय चुरशीचा व प्रतिष्ठेचा मानला जात आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे विशेष लक्ष लागले आहे..ज्या निलंग्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभर पसरवणारे माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. शिवाय लातूर जिल्ह्यावर निलंगेकर, देशमुख व चाकूरकर या तीन घराण्याचेच वर्चस्व गेल्या अनेक काळा पासून राहिले आहे.त्यात शिवराज पाटील चाकूरकर यांनाही मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे त्यामुळे लातूर शहर मतदार ससंघातील उमेदवार अमित देशमुख यांची जागा व निलंग्यातील माजी मंत्री संभाजी पाटील यांची जागा या दोन्ही दिग्गज नेत्याच्या विजयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..त्यातच निलंगा मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जवळपास तीन हजार 500 कोटीची मतदार संघात विकास कामे केली आहेत, बुथ रचना ग्रामीण भागापर्यंत कार्यकर्त्याची मजबूत फळी, त्याचबरोबर जातीय समीकरण ही त्यांच्या जमेची बाजू राहणार आहे..तर निलंगेकर घराण्याला वगळून काँग्रेसने यावेळी पहिल्यांदा तिकीट दिल्यामुळे निष्ठावंत निलंगेकर यांनी काँग्रेस उमेदवाराची कितपत काम केले हे महत्त्वाचे राहणार आहे. विजय कोणाचा होईल हे सध्या निश्चित सांगण्यात येत नसले तरीही कार्यकर्त्याकडून विजय पराजयाचे गणित मानले जात आहे.देवणी शहरांमध्ये काही कार्यकर्त्यांनी थेट संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विजयाचे बॅनर लावले आहे निकालाला काही तास बाकी असतानाच या विजय बॅनर चे सर्वत्र जोरदार चर्चा मात्र सुरू आहे.#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.