अप्पर तहसील कार्यालय वादाच्या भोवर्यात ; नागरिकाकडून विरोध

उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण
अप्पर तहसील कार्यालय वादाच्या भोवर्यात ;  नागरिकाकडून विरोध
Updated on

निलंगा : कासारसिरसी येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय नागरिकांच्या कामासाठी गैरसोयीचे झाले आहे. तहसील कार्यालय निलंगा येथेच ठेवण्यात यावे अशी मागणी कर्मयोगी स्व. डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समितीने एका निवेदनाद्वारे उपविभागीय आधिकारी यांच्याकडे केली.

सोमवारी दि. २४ रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहेत. अप्पर तहसील कार्यालय म्हणून शासनाकडून कोणताही प्रस्ताव नाही अथवा नागरिकांची मागणी नाही मात्र शासनाकडून अप्पर तहसील कार्यालयाचा हा लादलेला निर्णय आहे तो मागे घ्यावा या मागणीसाठी उपोषण सुरू झाले आहे.

अप्पर तहसील कार्यालय वादाच्या भोवर्यात ;  नागरिकाकडून विरोध
Solapur Barshi News : बार्शी तालुक्यातील पेरण्या पूर्णत्वाकडे; मात्र नदी, नाले कोरडेच

औसा विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या निलंगा तालुक्यातील ६३ महसूली गावासाठी कासारसिरसी ता. निलंगा येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत नुकताच शासन आदेश आला आहे या अप्पर तहसील कार्यालयाशी कासार सिरसी, कासार बालकुंदा, मदनसुरी, भूतमुगळी यासह अन्य मंडळातील कांही गावे असे एकूण ६३ महसुली गावांचा प्रशासकीय कारभार अपर तहसीलदार कार्यालयातून चालणार आहे. या भागातील लोकांना विधानसभा मतदारसंघ वेगळा तर तहसील कार्यालयाचे ठिकाण वेगळे म्हणून शासनाने अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचे आदेश दिले असले तरी यासाठी अनेक गावांनी कडाडून विरोध केला आहे.

अप्पर तहसील कार्यालय वादाच्या भोवर्यात ;  नागरिकाकडून विरोध
Pawar Vs Pawar : रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवार संतापले; म्हणाले, लोकप्रतिनिधींनी...

शिवाय आम्हाला निलंगा येथेच तहसील व अन्य कार्यालय सोईचे होणार असून निलंगा येथे पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय, पोलिस आधिकारी कार्यालय, सहकार कार्यालय भूमीअभिलेख कार्यालय, न्यायालय असे अनेक कार्यालय आहेत. त्यामुळे एका कामामध्ये विविध विभागाचे काम करता येतात शिवाय अनेक गावांना निलंगा शहर जवळ तर कासारसिरसी अंतर दुरवर होणार असल्याने तालुक्यातील जवळपास 45 गावांनी यासाठी ग्रामपंचायतचे ठराव घेऊन आम्हाला निलंगा तालुका तहसील कार्यालयातच ठेवा अशी मागणी बहूतांश गावातील ग्रामपंचायतीने निलंगा येथेच आमचे गाव ठेवावे या मागणीसाठीचे ठराव घेतले आहे.

अप्पर तहसील कार्यालय वादाच्या भोवर्यात ;  नागरिकाकडून विरोध
Ajit Pawar News : '...अन् मिरवायचं मात्र दोघांनीच!'; अजित पवारांना जाहिरातीतून वगळल्याने रोहित पवारांची टीका

माजी मुख्यमंत्री डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यानी कधीही तालुक्याचे विभाजन होऊ दिले नाही. अनेक विभागीय व उपविभागीय कार्यालये निलंगा येथे आणली. मात्र या तालुक्याचे तुकडे पाडण्याचे काम काही राजकारणी करत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे. कर्मयोगी डाॕ. शिवाजीराव पाटील निलंगेकर तालुका एकसंघ कृती समिती स्थापन करून उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांना आम्हाला निलंगा येथेच ठेवण्यात यावे यासाठी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष संभाजी तारे, कार्याध्यक्ष अशोक सूर्यवंशी, सचिव दयानंद मुळे, उपाध्यक्ष रामकिशन सावंत, अनिल आरीकर यासह आदीच्या स्वाक्षर्या आहेत.

अप्पर तहसील कार्यालय वादाच्या भोवर्यात ;  नागरिकाकडून विरोध
Ajit Pawar News : '...अन् मिरवायचं मात्र दोघांनीच!'; अजित पवारांना जाहिरातीतून वगळल्याने रोहित पवारांची टीका

महाविकास आघाडीचा पाठींबा

या उपोषण स्थळी अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्णयाला विरोध करीत निलंगा तालुका एकसंघ ठेवण्याच्या मागणीला महाविकास आघाडीच्या वतीने पाठीबा देण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे अविनाश रेशमे, काँग्रेसचे डाॕ. अरविंद भातांब्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडीतराव धुमाळ, दयानंद चोपणे, इस्माईल लदाफ, उपजिल्हा प्रमुख हरीभाऊ सगरे यासह आदीनी आपले मनोगत व्यक्त करून पाठींबा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.