नाही पुस्तक, नाही शाळा... सहलीत हवे तेवढे खुशाल खेळा...   

औढा नागनाथ ः नागनाथ मंदिरात कर्नाटक राज्यातील शालेय सहल दाखल झाली होती. 
औढा नागनाथ ः नागनाथ मंदिरात कर्नाटक राज्यातील शालेय सहल दाखल झाली होती. 
Updated on

औंढा नागनाथ ः शालेय जीवनातील आनंद देणारी बाब म्हणजे, शैक्षणिक सहल. सहलीला जाण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आसूसलेला असतो. सहल किती दिवसांची, कोठो जातेय यापेक्षा आपल्या सवंगड्यासह मौजमजा करायला मिळणार हा आनंद काही औरच असतो. सहलीतून मिळणाऱ्या आनंदाला द्विगुनीत करताना विद्यार्थ्यांनी धमाल केली.

    
बारा ज्योतिर्लिंगांमध्ये औंढा नागनाथ हे जगप्रसिद्ध हेमाडपंथी मंदिर व त्‍याला पर्यटनाची जोड दिल्याने येथे राज्यासह परराज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येत आहेत. सोमवारी (ता.सहा) कर्नाटक राज्यातील विद्यार्थी शिक्षकांसह दाखल झाले होते. मंदिरावरील कोरीव शिल्प पाहून ते भारावून गेले होते. त्‍यांना या मंदिराची पौराणिक माहिती पुजाऱ्यांनी दिली. औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राला एक नैसर्गिक अशी पार्श्वभूमी आहे. शहराच्या आजूबाजूला टेकड्या आहेत. त्यावरही गिर्यारोहणाचा आनंद हे छोटे बालमित्र घेत आहेत. येथे पर्यटन आणि अध्यात्म या दोन्हीही गोष्टी एका ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि पर्यटकांना भेटत असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची पर्यटकांसह शालेय विद्यार्थ्याच्या सहलीची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मंदिरावरील शिल्पांनी वेधले लक्ष
मंदिरावरील असलेल्या शिल्पात चारही युगांची शिल्प येथे आहेत. त्यामध्ये सैन्य, घोडदळ, हत्ती शिल्प कोरलेली आहेत. तसेच ऋषी मुनी, वैकुंठाला जाताना तुकाराम महाराज, अर्धनारी नटेश्वर , ब्रह्मा विष्णू, महेश हे तीन वायुतत्त्व त्यानंतर गणेशमूर्ती, रुसलेली पार्वती अशा विविध शिल्पकला या मंदिरावर आहेत.

येथील विद्यार्थी येतात सहलीला
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून औरंगाबाद, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी तसेच तेलंगणातील निजामाबाद, सिकंदराबाद, कर्नुल, विजयवाडा तसेच कर्नाटकातील बेंगलोर, बेळगाव, म्हैसुर, गुलबर्गा, आणि मध्यप्रदेशमधील महेश्वर, इंदोर येथील शाळा, महाविद्यालयातील सहली येत आहेत. 

शिल्‍पकलेसह नागनाथ उद्यानाचा घेतला आनंद
सहलीत येणाऱ्या या विद्यार्थ्यांना मंदिराची सखोल पौराणिक व अध्यामिक माहिती पुरोहित पिंटू ऋषी हे सांगत आहेत. दरम्यान, सोमवारी येथे कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांची सहल दाखल झाली होत्या. त्‍यांनी मंदिरातील शिल्‍पकलेसह नागनाथ उद्यान व बोटींगचा देखील आनंद घेतला. 


देशभरातून भाविक येतात दर्शनाला
बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या नागनाथ मंदिरात भाविकांची कायम गर्दी असते. राज्यासह देशभरातून भाविक येथे येतात. आता शाळा, महाविद्यालयातील सहली दाखल होत असून मंदिरावरील शिल्‍पकला व नागनाथ उद्यान पाहून हे विद्यार्थी भारावून जात आहेत.
-पिंटू ऋषी, स्थानिक रहिवासी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.