Maratha Reservation: "सुप्रीम कोर्टातील आरक्षणाची मागणी नाही, तर..."; जरांगेंनी राज ठाकरेंचा गैरसमज केला दूर

राज ठाकरेंनी जालन्यातील मराठा आंदोलकांची भेट घेतली तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची ग्वाही दिली.
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal
Updated on

Raj Thackeray On Maratha Reservation : जालन्यातील मराठा आंदोलकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी मराठा आरक्षण मिळणं शक्य नाही, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली.

पण आम्ही त्यांचा संभ्रम दूर करत आमची मागणी सुप्रीम कोर्टातील नाहीतर मराठवाड्यातील शेतकरी कुणबी या आरक्षणाची आहे, असं स्पष्टीकरण यावेळी जिरांगे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. (No demand for Maratha Reservation in SC Manoj Jirange clear his stant after meeting with Raj Thackeray)

Maratha Reservation
ST Bank Sadavarte: सदावर्ते अडचणीत! पॅनेल प्रशासनानं एसटीच्या बँकेतून शेकडो कोटींच्या ठेवी काढल्याचा आरोप

राज ठाकरेंचा संभ्रम केला दूर

जरांगे म्हणाले, "सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाबाबत राज ठाकरेंनी आमच्या चर्चेदरम्यान मुद्दा उपस्थित केला. पण आमची मागणी सुप्रीम कोर्टातील आरक्षणाबाबत नाही. पूर्वी आम्हाला आरक्षण होतं त्यासाठी हा लढा आहे.

राज ठाकरेंच्या म्हणण्याचा उद्देश असा होता की, हे आरक्षण मिळू शकत नाही. ते तुम्हाला झुलवत ठेवतील. पण जेव्हा आम्ही कुठल्या आरक्षणाबाबत बोलतो आहोत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सकारात्मक झाले" (Latest Marathi News)

Maratha Reservation
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा; वडेट्टीवारांची मागणी

हैदराबाद संस्थानात आरक्षण होतं

"सुप्रीम कोर्टात गायकवाड आयोगानं मराठा आरक्षणाचा जो अहवाल सादर केला त्या आरक्षणाची आमची मागणी नाही, हे एसईबीसीचं आरक्षण रद्द झाल्यानं आमची त्याची मागणी नाही. मराठवाडा एक वर्षानंतर अखंड महाराष्ट्रात सहभागी झाला.

आम्ही हैदराबाद संस्थानात असताना मराठ्यांना आरक्षण होतं. पण पुढे आम्हाला ते आरक्षण लागू केलं गेलं नाही. हे आम्ही राज ठाकरेंना सांगितल्यानंतर त्यांच्या खरा विषय लक्षात आला," असंही ते यावेळी म्हणाले. (Marathi Tajya Batmya)

Maratha Reservation
Maratha Reservation: फडणवीसांचा जरांगेंशी फोनवरुन संवाद, दिला चर्चेचा प्रस्ताव; CM शिंदेही संवाद साधणार

सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं

"मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रतील मराठा यांचा मूळ व्यवसाय शेती हा आहे. त्यामुळं राज्यातील सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, म्हणून आम्ही हा लढा उभा केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आरक्षणाशी आमचा काहीही संबंध नाही. जालन्यातील काही तालुक्यांत कुणबींचे जुने पुरावे सापडले आहेत.

काल गिरीश महाजनं यांनी सांगितलं होतं की, आम्हाला जीआर काढण्यासाठी काही आधार पाहिजे, आज आम्हाला पुरावे मिळाले आहेत. ही बाब आम्ही राज ठाकरेंना सांगितली, त्यानंतर आता आपण तज्ज्ञांकडून यावर माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांशी बोलतो असं आम्हाला सांगितलं, अशी माहिती देखील यावेळी मनोज जरांगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.