‘या’ विद्यापीठात दर गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’

veikal 2.jpg
veikal 2.jpg
Updated on

नांदेड ः सकाळचे दहा वाजले की ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा परिसर वाहनांच्या गाड्यांच्या वर्दळीने गजबजून जातो. विद्यापीठातील प्रत्येक संकुल, ग्रंथालय आणि कँटीनच्या आवारात दुचाकीवरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात गजबज असते. परंतु विद्यापीठात आता आठवड्यातून एक दिवस दर गुरुवारी ‘नो व्हेईकल डे’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

विद्यापीठाचा परिसर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येत असून त्यानुसार प्रत्येक गुरुवारी विद्यापीठाच्या कोणत्याही विभागात ये-जा करण्यासाठी ‘नो व्हेईकल-डे’ मोहिम राबविण्यात येणार आहे. दरम्यान दर गुरुवारी विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व बाहेरुन येणारे अभ्यागत हे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारातून प्रवेश करतात त्यांनी आपली चारचाकी, दुचाकी व इतर वाहने विद्यापीठाच्या नानकसर रस्त्याच्या लगत लावावीत व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करुन विद्यापीठ परिसरात येतात, त्यांनी आपली चारचाकी, दुचाकी व इतर वाहने विद्यापीठाच्या फॅकल्टी हाऊस परिसर, पांगरी सुरक्षा चौकीच्या लगतच्या परिसरात लावण्याचे परिपत्रक विद्यापीठाने काढले आहे. 

सायकलचा वापर करण्यासाठी सवलत ः
ही मोहिम राबविण्यासाठी अधिव्याख्याते, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी यांना या मोहिमेत सहभागी होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जे याचे पालन करणार नाहीत त्यांना २०० रूपये दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान यात दिव्यांगांना सूट देण्यात आली आहे. सदर दिवशी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांना सायकलचा वापर करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. 

सायकल शेअरिंग योजनेची गरज ः
‘स्वाराती’म विद्यापीठात पहिल्यांदाच ‘नो व्हेईकल डे’ असा उपक्रम राबविण्यात येत असल्याने या उपक्रमाचे कौतुक होईल. दरम्यान विद्यापीठाने सायकल शेअरिंग योजना सुरू केल्यास यास अजून प्रतिसाद मिळेल. विद्यापीठाचा परिसर मोठा आहे. अगदी शेवटच्या टोकापर्यंत संकुल आहेत. त्यामुळे पायपिट होणार आहे. या मोहिमेला कितपत यश मिळते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

विविध कार्यालयातही अंमलबजावणी करावी ः 
खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका तेसेच काही मोठ्या कार्यालयानेही प्रत्येक महिन्याचा शेवटचा दिवस ‘नो व्हेईकल डे’ असा उपक्रम राबवून साजरा करावा. कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांसह पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांसाठी उपक्रम राबविण्याचा निर्णय विशेष सभेत घेण्यात यावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.