विषमुक्त अन्न ही काळाची गरज- गोविंद कल्याणपाड

वसमत येथील सोमनाथ सेंद्रीय भाजीपाला व धान्य विक्री केंद्राचे उद्घाटन वसमत तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्यानपाड यांच्या हास्ते करण्यात आले.
सेंद्रीय भाजीपाला , वसमत
सेंद्रीय भाजीपाला , वसमत
Updated on

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : कोरोनासारख्या महामारीत शरिराची ईम्यूनिटी वाढविण्यासाठी विषमुक्त भाजीपाला, फळे व धान्याची गरज असून सोमनाथ सेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्राच्या माध्यमातून नागरीकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी बुधवारी ( ता. ३०) केले.

वसमत येथील सोमनाथ सेंद्रीय भाजीपाला व धान्य विक्री केंद्राचे उद्घाटन वसमत तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्यानपाड यांच्या हास्ते करण्यात आले. यावेळी तालुका कृषी विभागमधील आत्मा विभागाचे अधिकारी श्री. घुगे, सातेफळ येथील सरपंच प्रकाश, जयप्रकाश नारायण बँकचे मुख्य व्यवस्थापक बबराव अंभोरे, पुणे विभाग सी. ए. द्वादशी, श्री. गुंडाळे, ग्रंमपचायत सदस्य शिवानंद स्वामी, पिंटु रावले, तुकाराम भालेराव, सोमनाथ सेंद्रीय बचत गटाचे अध्यक्ष श्रीहारी अंभोरे पाटील, सचिव राजाम अंभोरे, मदन हारबळे, प्रल्हाद भोसलेसह बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा - पोलिस असल्याचे सांगून वाहनांची तपासणी; तोतया पोलिसांना ठोकल्या बेड्या

तालुका कृषी अधिकारी श्री कल्याणपाड यावेळी बोलताना म्हणाले की, सोमनाथ सेंद्रिय शेतकरी बचतगट सातेफळ यांनी गेल्या काहिदिवसातच मोठी गगन भरारी घेतली आहे. या बचत गटाने वसमत शहरातील नागरिकांना ताजा भाजीपाला व धान्य देण्याचे एक धाडस केले. त्यामुळे करोणा सारख्या महामारीत अनेकांना विषमुक्त अन्नाधान्य, भाजीपाला मिळाला. या बचत गटाच्या उपक्रमांनी शहरातीलच नव्हे तर शहराबाहेर सुद्धा सेंद्रीय भाजीपाला धान्य नागरिकांना खायला मिळायला आहे.

मुख्यमंत्री महत्वकांक्षी योजनेमध्ये मध्ये सोमनाथ शेंद्रिय बचत गटाला हिंगोली जिल्हा परिषदअधिकारी यांनी मोठे सहकार्य केले. तसेच मी व श्री माळी व आमच्या वरिष्ठ अधिकारी यांणी मोठें योगदान दिले. मुख्यमंत्री महत्वकांशी योजनेमधून सोमनाथ सेंद्रिय बचत गटाला जो गाळा उपलब्ध करुन दिला त्यामुळे वसमत शहरातील नागरिकांना मुख्य रस्त्यावर भाजीपाला मिळण्याची सोय झाली आहे. सेंद्रिय बचत गटाने हा जो उपक्रम सुरु केला आहे हा उपक्रम कायमस्वरुपी चालवावा. शहर व परिसरातील नागरिकांना विषमुक्त अन्न धान्य व भाजीपाला फळे उपलब्ध करून द्यावा यासाठी मी तालुका कृषी अधिकारी या नात्याने कृषी विभागाकडून बचत गटाच्या अडीअडचणी मांडण्याचं कार्य करेल व अशा बचत गटांच्या पाठीमागं कृषी अधिकारीच नाही तर लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद अधिकारी, पदाधिकारी व आमचे सर्व कृषी विभागाचे सहकारी अधिकारी खंबीरपणे पाठीमागे उभे राहतील असे सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.