यवतमाळ जिल्ह्यात शिंदे गटाला झुकते माप

भाजपमध्ये नाराजी; राठोड समर्थकांचा जल्लोष
bjp
bjpsakal
Updated on

यवतमाळ - शिंदे-फडणवीस सरकारातील मंत्र्यांचा शपथविधी मंगळवार (ता. 9) पार पडला. पहिल्या टप्प्यात संजय राठोड यांच्या रुपाने जिल्ह्याला लाल दिवा मिळाला आहे. राठोड यांनी मंत्रीपदांची शपथ घेतल्यानंतर यवतमाळ येथे त्यांचे निवासस्थान तसेच दिग्रस, नेर शहरात सर्मथकाकडूनं जल्लोष करण्यात आला. जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. रस्ते बंद आहेत, शेतकरी संकटात असताना राठोड समर्थकांकडून फटाके फोडून करण्यात येत असलेल्या जल्लोषावर शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संजय राठोड यांनी युती सरकारच्या काळात महसुल राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राठोड यांचेकडे वनखात्यांची जबाबदारी होती. मात्र, एका प्रकरणात भाजप नेत्यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

मंगळवार (ता. नऊ) शिंदे-फडणवीस सरकार मधील मंत्र्यांनी शपथ घेतली. यात संजय राठोड यांनी कॅबीनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर यवतमाळ, नेर तसेच दिग्रस शहरात जल्लोष करण्यात आला. दुसरीकडे जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असतानाही एकालाही संधी मिळाली नाही. त्यामुळे भाजप पदाधिकार्‍यांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. विशेष म्हणजे, मंत्रीपद मिळाल्यानंतरही राठोड समर्थक वगळता एकाही शिवसैनिकांनी जल्लोष केला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()