परभणी : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पूर्वतयारी म्हणून परभणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध पथकांची स्थापना केली असून या पथकांच्या माध्यमातून शहरातील वेगवेगळ्या भागातील रहिवाशांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. हे काम अत्यंत सूक्ष्म पद्धतीवर केले जाणार असून प्रत्येक प्रभाग व वार्डातील नागरिकांची याद्वारे माहिती घेतली जाणार आहे.
परभणी शहराच्या Containment Micro Plan मधील तत्काळ प्रतिसाद पथकामध्ये १४ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचे नियंत्रणात प्रत्यक्षात काम करण्यासाठी १६ प्रभागांकरिता प्रभागनिहाय १६ पथक स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रभागाचे पालक अधिकारी हे प्रमुख असून वैद्यकीय अधिकारी, सहायक आयुक्त प्रभाग समिती, स्वच्छता निरीक्षक, बांधकाम अभियंता, पाणी पुरवठा अभियंता, कर वसुली लिपीक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागातील सहा वैद्यकीय अधिकारी यांचे सहा पथके तयार करण्यात आलेली आहेत. वैद्यकीय पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच Containment Zone परिसराचे सर्वेक्षण करण्यासाठी एक आशा स्वयसेविका व एक अंगणवाडी सेविका, असे एक पथक प्रत्येकी ५० घरांसाठी याप्रमाणे एकूण ९९ पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर चार पथकांमागे एक ए. एन. एम. सुपरवायझर म्हणून तसेच एक वैद्यकीय अधिकारी नोडल अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहे.
हेही वाचा - द्राक्ष उत्पादक अडचणीत
घरोघरी जाऊन सर्वेक्षण पूर्ण
परभणी महापालिकेने आशा व एएनएममार्फत घरोघरी जाऊन ताप, सर्दी, खोकला व सारी या रुग्णांचा सर्वेक्षण केले. शहरामध्ये १८ ठिकाणी मराठी व उर्दू होर्डिंग्ज, आॅटो अलाउन्सिंग, घंटागाडीद्वारे अलाऊन्समेन्ट, वर्तमान पत्र, मराठी व उर्दू पॉम्पलेट वाटप करून जनजागृती करण्यात आली. तसेच शहरामध्ये स्वच्छतेची कामे, सातत्याने निर्जंतुकीकरण औषध फवारणी, मलेरिया धूरफवारणी करण्यात येत आहे. तसेच शहरातील सर्व खासगी दवाखाने चालू राहतील यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.
नियोजनासाठी आयुक्तांची बैठक
महापालिका स्तरीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष व तत्काळ प्रतिसाद पथकाची आयुक्त रमेश पवार यांचे अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. आठ) बैठक संपन्न झाली. यामध्ये आयुक्त रमेश पवार यांनी परभणी शहरामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा बाधित रुग्ण आढळून आल्यास तत्काळ प्रतिसाद पथकाने काय व कशा प्रकारे उपाययोजना व कार्यवाही करावयाची आहे, या बाबत मार्गदर्शन केले.
हेही वाचा - धर्माबादेत पाचशे रुपायांसाठी जीव धोक्यात
महापालिका पथकाचा लेखाजोखा
- पथकामध्ये १४ अधिकाऱ्यांची नियुक्ती
- शहरातील १६ प्रभागांसाठी १६ पथके तैनात
- सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहा वेगळी पथके
- अंगणवाडी सेविका व आशांचे ९९ पथके
- सातत्याने चालत आहे शहरात निर्जंतुकीकरण
...
युद्धपातळीवर उपाययोजन
कोरोना विषाणूशी लढण्यासाठी पूर्वतयारी म्हणून करण्यात आलेल्या Containment Micro Plan नुसार युद्धपातळीवर उपाययोजन करण्यासाठी महापालिका तयार आहे.
- रमेश पवार, आयुक्त, महापालिका, परभणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.