परभणीची वाटचाल शतकाकडे !

file photo
file photo
Updated on

परभणी : परभणी शहरातील सुंदराईनगर मधील एका ४७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागन झाल्याचे शुक्रवारी (ता.१९) रात्री स्पष्ट झाले. त्या व्यक्तीला तातडीने कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीच्या सहवासात आलेल्या एकूण ४० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली.
दरम्यान, शनिवारी (ता.२०) खंडोबा बाजार परिसरातील अपना कॉर्नर भागात राहणाऱ्या एक महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे परभणीत आता कोरोना बाधितांची संख्या एकूण ९६ झाली असून शतकाकडे वाटचाल सुरु आहे.

परभणी शहरातील सुंदराई नगर परिसरात राहणारे ४७ वर्षीय व्‍यक्‍तीला छातीत वेदना होत असल्‍याने शहरातील एका खासगी हॉस्पीटलमध्‍ये ता. १७ जून रोजी भरती करण्यात आले होते. या व्यक्तीचा ता. १९ जून रेाजी स्‍वॅब घेण्यात आला होता. शुक्रवारी (ता.१९) रात्री या व्यक्तीचा स्वॅब अहवाल प्राप्त झाला. त्यात त्याला कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले. सदरील व्यक्तीस तातडीने कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


नातेवाईकांसह इतरांना केले क्वारंटाइन
कोरोना बाधीत व्यक्तीची पत्नी व कुटूंबातील भाऊ, बहीन मुले असे १९ जणांपैकी हायरिस्‍क कॉन्‍टॅक मध्‍ये असलेल्या १३ जणांना व लो रिस्‍क कॉन्‍टॅक मध्‍ये सहा जणांना औद्योगिक प्रशिक्षण येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर सहावासातील इतर २१ नागरिकांना वसंत वस्‍तीगृहामध्‍ये क्वारंटाइन करण्‍यात आले आहे.

सुंदराईनगर केले सिल
खबरदारीची उपाययोजना म्‍हणून त्‍यांच्‍या घराचा परिसर सिल करण्‍यात आला आहे. प्रतिबंधीत क्षेत्र म्‍हणून त्याला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी घोषीत केले आहे. सदर परिसर निर्जंतूकीकरण करून घेण्‍यात आला. आरोग्‍य विभागाच्‍या पथकामार्फत वैद्यकीय अधिकारी, स्‍टाफनर्स, एएनएम, आशावर्कर, अंगणवाडीताई यांच्‍यामर्फत सर्वेक्षणाचे काम करण्‍यात चालू करण्‍यात आलेले आहे.

शनिवारी एक महिला पॉझिटीव्ह
जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षात उपचार घेत असलेला एक रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने शनिवारी (ता.२०) रुग्णालातून सुटी दिली आहे. त्यात शहरातील सरफराजनगर भागातील व्यक्तीचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी (ता.२०) खंडोबा बाजार परिसरातील अपना कॉर्नर भागात राहणाऱ्या एक महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.  जिल्हा प्रशासनाने तातडीने या परिसरास प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केले. निर्जंतुकीकरण करण्यासह उपाय योजना केल्या जात आहेत.

चार जणांवर उपचार सुरु

संशयितांची संख्या २५६३ झाली आहे. घेण्यात आलेल्या एकूण स्वॅबची संख्या २७५९ झाली असून एकूण २५३७ जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. शनिवारी एकही स्वॅब नांदेड येथील प्रयोगशाळेकडे प्रलंबीत नव्हते. आतापर्यंत ८० अनिर्णायक ४७ स्वॅब तपासणीस आवश्यक नसल्याचा अहवाल नांदेड प्रयोगशाळेद्वारे प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९६ रुग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. ८९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णांना सुटी दिली आहे. आता रुग्णालयात अवघे चार कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.