वडीगोद्री - ओबीसीच्या न्याय हक्कासाठी अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे उपोषण करण्यासाठी निघालेले ओबीसी नेते, आंदोलक नवनाथ वाघमारे व सहकारी यांना वडीगोद्री, अंतरवाली सराटी रोडवर मंगळवार ता. 17 रोजी जालना पोलीस प्रशासनाने रोखले .
अंतरवाली सराटी येथे उपोषणला बसायचे आहे, आम्हाला तिथे जाण्यापासून का रोखल जात आहे, येथे उपोषणसाठी मनोज जरांगे यांना परवानगी आहे, आम्हाला का नाही? मला तिथे उपोषण करायचे आहे, मी निवेदन दिले आहे. असे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित पोलिस अधिकारी यांना सांगितले.