OBC Reservation: ओबीसींच्या डोळ्यात भाजपकडून धूळफेक, 'या' नेत्याने केला आरोप!

Jalna latest News: विनोद यादव यांनी सूत्रसंचालन केले. जालिंदर डोईफोडे यांनी आभार मानले.
OBC Reservation: ओबीसींच्या डोळ्यात भाजपकडून धूळफेक, 'या' नेत्याने केला आरोप!
Updated on

Latest Marathwada News: भाजप आरक्षणाच्या नावावर ओबीसी समाजाच्या डोळ्यात केवळ धूळफेक करून मूर्ख बनवित आहे. ओबीसी समाजाने सातत्याने न्याय देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी केले.

येथील एका मंगल कार्यालयात आयोजित जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार राजेश राठोड, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहराध्यक्ष शेख महेमुद,ओबीसी विभागाचे विभागीय अध्यक्ष डॉ. कांचन चाटे, नाशिक विभागाचे अध्यक्ष विजय राऊत, काँग्रेसचे प्रदेश सचिव कल्याण दळे आदींची उपस्थित होती.

OBC Reservation: ओबीसींच्या डोळ्यात भाजपकडून धूळफेक, 'या' नेत्याने केला आरोप!
Laxman Hake यांनी मद्यप्राशन केल्याचा Video Viral, मराठा आक्रमक | Maratha vs OBC Reservation

खासदार डॉ. कल्याण काळे म्हणाले, की मुस्लिम, दलित, ओबीसी हे जात समूह काँग्रेसचा पाया आहे. मधल्या काळात हे जात समूह काँग्रेस पक्षापासून दूर गेले होते, ते अलीकडे पुन्हा काँग्रेसकडे आले आहेत. केवळ ओबीसी समाजच नव्हे तर अठरापगड जात समूहाला संघटित करण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. ओबीसी विभागाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवप्रकाश चितळकर यांनी प्रास्ताविक केले. विनोद यादव यांनी सूत्रसंचालन केले. जालिंदर डोईफोडे यांनी आभार मानले.

OBC Reservation: ओबीसींच्या डोळ्यात भाजपकडून धूळफेक, 'या' नेत्याने केला आरोप!
OBC reservation : अठरापगड जातींची मोट बांधावी : प्रा. लक्ष्मण हाके यांचे ओबीसी नेत्यांना आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.