परतूर - शहरात बुधवारी ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन तहसील कार्यालया समोर करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने समुदाय उपस्थित होता.यावेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान, शहरात रेल्वे स्थानकापासून ते तहसील कार्यालया पर्यंत भव्य असा मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला यावेळी जवळपास पाच हजार दुचाकी सह अनेक पदचारी सहभागी झाले होते. यानंतर येथील तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊ नये तसेच ओबीसी शिष्यवृत्ती मध्ये वाढ करणे व जनगणना करावी अशी मागणी सर्वच समाज बांधव यांनी केली. या ठिकाणी विचार मांडताना अनेक सर्वांचा एकच सूर होता की मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसी कोठ्यातून नको असे सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ओबीसी समाजात अनेक भटक्या विमुक्त जाती आहेत त्या आणखी आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या सक्षम नाही यासाठी शासनाने उपाय योजना करणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रिया आल्या. सकाळी रॅलीची सुरवात मोंढा येथील रेल्वे स्टेशन परिसरातून झाली. तहसील कार्यालयात अतिशय शिस्त बद्ध पद्धतीने हा मोर्चा पोहचला.
जिल्हा परिषद शाळेत सर्व वाहनां साठी वाहन स्थळ ठेवले होते. चोख पद्धतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ना. छगनराव भुजबळ यांच्या बद्दल मनोज जारांगे यांनी एकेरी भाषेत उल्लेख केला बद्दल ओबीसी समाजाच्यावतीने वतीने घोषणाबाजी करत तीव्र विरोध दर्शविला. आ. पडळकर यांच्या जयजयकार करत पूर्ण परिसर दणाणले होता.
स्व. गोपीनाथ मुंडेची आठवन निघतच अनेक जने भावुक झाल्याचे चित्र देखील या ठिकाणी दिसून आले. बंजारा समाजाच्या युवकांनी पारंपरिक वेशभूषा करत सर्व मोर्चाचे लक्ष्य वेधून घेतले होते संत सेवालाल महाराज यांचा जयघोष करत मोठया प्रमाणात बंजारा समाज सहभागी होता. आष्टी, परतूर, वाटुर येथील न्हावी, परिट समाजाने आपली दुकाने बंद करून मोर्चात सहभाग नोंदवला होता. लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महात्मा बसवेश्वर चौकात पूजन करत रॅलीला सुरवात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.