धाराशिव : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसअखेर म्हणजे शुक्रवारी (ता. १९) ३६ उमेदवारांनी एकूण ५० नामनिर्देशनपत्र (उमेदवारी अर्ज) निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे दाखल केले आहेत.
शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये आर्यनराजे शिंदे (अपक्ष), राजकुमार पाटील (अपक्ष), संजयकुमार वाघमारे (बीएसपी), विलास घाडगे (अपक्ष), शामराव पवार (समनक जनता पार्टी), नवनाथ उपळेकर (अपक्ष), ॲड.विश्वजीत शिंदे (आदर्श संग्राम पार्टी), हनुमंत बोंदर (अपक्ष), योगीराज तांबे (अपक्ष),
उमाजी गायकवाड (अपक्ष), अर्चना पाटील (राष्ट्रवादी), नेताजी गोरे (अपक्ष), समीरसिंह साळवी (अपक्ष), काकासाहेब खोत (अपक्ष), बाळकृष्ण शिंदे (अपक्ष), भाऊसाहेब आंधळकर (अपक्ष), सोमनाथ कांबळे (अपक्ष),गोवर्धन निंबाळकर (अपक्ष), काका कांबळे (अपक्ष), शेख नौशाद इकबाल (स्वराज्य शक्ती सेना पार्टी), राम शेंडगे (अपक्ष),
नितीन मोरे (अपक्ष), अरुण जाधवर (ओबीसी बहुजन पार्टी), सिद्दीक इब्राहीम बोडीवाले (एआयएमआयएम), वर्षा कांबळे (अपक्ष), भाऊसाहेब बेलुरे (अपक्ष), नितीन गायकवाड (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे.
या २७ उमेदवारांनी ३३ अर्ज दाखल केले आहेत. राजकुमार पाटील, अर्चना पाटील, नेताजी गोरे व ॲड. विश्वजीत शिंदे या उमेदवारांनी दोन व तीन नामांकन अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवसअखेर ३६ उमेदवारांनी एकूण ५० नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
शेवटच्या दिवशी ६ जणांनी २० अर्जाची खरेदी केली आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत ७५ जणांनी १७५ अर्ज खरेदी केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.